💥आगामी काळात नाथ शिक्षण संस्था सबंध महाराष्ट्रात आदर्श शैक्षणिक पॅटर्न निर्माण करेल - सौ.राजश्रीताई धनंजय मुंडे


💥शारदा विद्यामंदिर चे मुख्याध्यापक श्री नारायण गरड यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार सोहळा संपन्न💥


परळी वै. (प्रतिनिधि) - येथील नाथ शिक्षण संस्थेअंतर्गत असलेल्या शारदा विद्या मंदिर चे मुख्याध्यापक श्री.नारायणराव गरडसर हे ३० वर्षांच्या यशस्वी प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयोमानानुसार दि.३० ऑगस्ट २०२२ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त दिनांक २ सप्टेंबर रोजी नाथ शिक्षण संस्थेतर्फे सेवानिवृत्ती निमित्त गरड यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन परळी शहरातील आर्यवैष्य मंगल या ठिकाणी करण्यात आले होते. यावेळी बोलताना नाथ शिक्षण संस्था बीड जिल्ह्यातच नव्हे तर सबंध महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रात एक नवीन आदर्श निर्माण करत राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करेल व आपला आगळावेगळा शैक्षणिक पॅटर्न निर्माण करेल असे प्रतिपादन नाथ शिक्षण संस्थेच्या सचिव सौ. राजश्रीताई मुंडे यांनी केले.


  या सत्कार सोहळ्यास नाथ शिक्षण संस्थेच्या सचिव सन्माननीय सौ.राजश्रीताई धनंजयजी मुंडे, सहसचिव श्री.प्रदीपजी खाडे साहेब, गट शिक्षणाधिकारी श्री.सोनोने साहेब, परळी वै. ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.मुंडे साहेब, प्रसिद्ध उद्योजक श्री.सुरेश नाना फड साहेब, श्री.देवकते साहेब, शारदा प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. देशमुख सर , मिलिंद प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.राठोड सर, मिलिंद माध्यमिक व ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक श्री.कोम्मावार सर व उप-प्राचार्य श्री.इरफान शेख सर, पर्यवेक्षक श्री.लोणीकर सर, नाथ शिक्षण संस्थेचे समन्वयक तथा यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.अतुल दुबे सर ईत्यादी मान्यवरांची तथा सत्कार मुर्ती श्री.व सौ. गरड दांपत्याची मंचावर उपस्थिती होती.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक शारदा विद्यालयाचे सहशिक्षक श्री.धायगुडे सर यांनी केले. मनोगत कोम्मावार सर व सत्कारमुर्ती गरड सर यांची कन्या यांनी व्यक्‍त केले. कार्यक्रमास प्रमुख उपस्थित आसलेल्या नाथ शिक्षण संस्थेच्या सचिव आदरनीय सौ.राजश्रीताई धनंजयजी मुंडे यांच्या हस्ते श्री.गरड सर यांना त्यांच्या तीस वर्षांच्या यशस्वी सेवेबद्दल भेटवस्तू व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. 

  या प्रसंगी राजश्रीताई यांनी आपल्या भाषणात नाथ शिक्षण संस्थेअंतर्गत येत असलेल्या सर्व शिक्षण संस्थांमध्ये चालू असलेल्या विविध शैक्षणिक कार्यांची स्तुती करत समाधान व्यक्त केले. येणाऱ्या काळात नाथ शिक्षण संस्था बीड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात उल्लेखनीय शैक्षणिक कार्य करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यासाठी संस्थेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रामाणिक कर्तव्यास सज्ज राहून स्वतःसह आपल्या संस्थेचा नावलौकिक वाढवण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी सत्कारमूर्ती श्री. नारायणराव गरड सर यांनी सेवाकाळातील गोड कटू अनुभवांना उजाळा दिला.

 अध्यक्षीय समारोपात नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव श्री.प्रदीपजी खाडे साहेब यांनी  श्री.गरड सरांना भावी आयुष्य आरोग्यासह सुख समाधानाने जावे अशा सदिच्छा व्यक्त केल्या. तसेच येत्या काळात नाथ शिक्षण संस्था वटवृक्ष होणार आहे त्या दृष्टीने संस्थेअंतर्गत सर्व शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने कर्तव्य पार पाडावे व संस्थेचा नावलौकिक वाढवावा असे आवाहन केले. कार्यक्रमास नाथ शिक्षण संस्थेअंतर्गत येत असलेल्या मिलिंद प्राथमिक, माध्यमिक व ज्युनियर कॉलेज, यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय,  शारदा विद्यामंदिर येथे कार्यरत सर्व शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आभार प्रदर्शन मिलिंद माध्यमिक विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.लोणीकर सर यांनी केले.

परळी शहराच्या आजपर्यंतच्या शैक्षणिक इतिहासात सर्वप्रथमच सेवानिवृत्ती बद्दल आपल्या शैक्षणिक कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ त्यांची रथातून वाजत गाजत मिरवणूक काढणारी नाथ शिक्षण संस्था ही एकमेव शिक्षण संस्था ठरली असून नाथ शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापनाच्या वतीने सेवानिवृत्तीबद्दल शारदा विद्या मंदिर चे मुख्याध्यापक श्री नारायण गरड यांची सपत्नीक रथातून मिरवणूक काढण्यात आली होती. परळीत अशा प्रकारे एखाद्या शिक्षकाच्या निवृत्तीचा सन्मान करणारी मिरवणूक पहिल्यांदाच काढण्यात आल्याने हा नाविन्यपूर्ण उपक्रम परळीकरांसाठी कुतूहलाचा व चर्चेचा विषय ठरला. यावेळी नाथ शिक्षण संस्थेच्या या सत्कार सोहळ्याला उत्तर देताना तथा अभार मानताना सत्कारमूर्ती मुख्याध्यापक श्री नारायण गरड यांना गहीवरून आले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या