💥जिंतूर नाभिक समाजाने सेलू बलात्कार प्रकरणाचा मोर्चा काढून केला निषेध....!


💥घटनेतील आरोपींना कठोर शासन व्हावे याकरिता तहसीलदारां मार्फत मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन💥

जिंतूर तालुका / बी.डी.रामपूरकर

जिंतूर: सेलू येथील एका अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करावी या मागणीसाठी जिंतूर नाभिक समाजाच्या वतीने गुरुवारी जिंतूर तहसील कार्यालयावर मोठा मोर्चा काढण्यात आला.

सेलुतील घटनेतील आरोपीविरुद्ध पोक्सा अंतर्गत कारवाई करावी जलद गतीच्या न्यायालयात खटला चालवावा, त्यासाठी नामवंत वकील अँड. उज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी या संतप्त नागरिकांनी निवेदनाद्वारे केली. या निवेदनावर अशोक वाघमारे, श्रीराम वायगुडघे, मारुती मोरे, अमोल हरणे, उत्तम खाडे, गजानन कंठाळे, रामप्रसाद काळे, माधवराव सूर्यवंशी, रामप्रसाद कंठाळे, दत्ताभाऊ कंठाळे, शिवराम कंठाळे, संदीप काळे यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते.....,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या