💥पन्नास खोक्यांची घोषणाबाजी करणाऱ्या ऊध्दव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनो मातोश्रीवर आतापर्यंत किती खोके गेले हे विचारा..?


💥परभणीत राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचे ५० खोक्यांची घोषणाबाजी करणाऱ्यांना सडेतोड प्रत्यूत्तर💥

परभणी (दि.२५ सप्टेंबर) : उध्दव ठाकरे गटाच्या 50 खोक्यांची घोषणाबाजी करणार्‍या कार्यकर्त्यांनी मातोश्रीवर आतापर्यंत किती खोके गेले हे सुध्दा एकदा विचारुन घ्यावे असा खोचक टोला राज्याचे कृषिमंत्री तथा शिवसेना (शिंदे) गटाचे नेते अब्दुल सत्तार यांनी काल शनिवार दि.२४ सप्टेंबर २०२२ रोजी लगावला.

             शिवसेना शिंदेगटाच्यावतीने काल शनिवार दि.२४ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी कृष्णा गार्डनच्या सभागृहात पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख माजी खासदार अ‍ॅड. सुरेश जाधव, सहसंपर्कप्रमुख भास्कर लंगोटे, माजी आमदार हरिभाऊ लहाणे, जिल्हाप्रमुख माधवराव कदम, जिल्हाप्रमुख व्यंकटराव शिंदे, महानगर जिल्हाप्रमुख प्रवीण देशमुख,धम्मदिप रोडे यांच्यासह अन्य पदाधिकारी व्यासपीठावर विराजमान होते. याप्रसंगी सत्तार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे दमदार वाटचाल करीत आहे. विशेषतः स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या विचारांवर महाराष्ट्र मजबुतीकरणाचे काम करीत आहे, असे नमूद केले. एकनाथ शिंदे आणि ठाकरे यांच्या सरकारमधील मोठा फरक सर्वसामान्य नागरीकांना कळून चुकला आहे, असेही ते म्हणाले. हिंदू गर्व गर्जना यात्रेच्या माध्यमातून आपण दोन जिल्ह्यात प्रवास केला. अन्य दोन जिल्ह्यातही जाणार आहोत. आपल्या या यात्रेस शिवसैनिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. मुंबईतील दसरा मेळाव्यातूनसुध्दा अभूतपूर्व प्रतिसाद मिळेल, असा विश्‍वास सत्तार यांनी व्यक्त केला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या