💥स्टँड अप योजनेंतर्गत मार्जिन मनीसाठी अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकाकरीता मेळाव्याचे आयोजन....!


💥जिल्ह्यातील अनुसुचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकातील सवलतीस पात्र नव उद्योजक लाभार्थ्यांनी उपस्थित राहावे - गिता गुठठे

परभणी (दि.16 सप्टेंबर) : केंद्र शासनाच्या स्टँड अप योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकाकरिता मार्जिन मनी उपल्ब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्रमांक –मसाका-2018/प्र.क्र.259(2)अजाक,मुंबई दिनांक 08 मार्च,2019 चे शासन निर्णय निर्गमित केलेले आहे. जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकातील सवलतीस पात्र नवउद्योजक लाभार्थी यांना एकुण प्रकल्प किंमतीच्या स्वहिस्सा 25% रकमेपैकी जास्तीत जास्त 15% मार्जीन मनी शासनाकडुन उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्याकरिता जिल्हयातील अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकातील सवलतीस पात्र उद्योजक लाभार्थी यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, परभणी येथे दिनांक 21 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 12.00 वाजता केंद्र शासनाच्या स्टँड अप योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकाकरिता जास्तीत जास्त तळागळातील लाभार्थ्यांना लाभ पोहोचण्याकरिता केंद्र शासनाच्या स्टँड अप योजनेअंतर्गत मार्जिन मनी उपलब्ध करुन देण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील अनुसुचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकातील सवलतीस पात्र नव उद्योजक लाभार्थी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्रीमती गिता गुठठे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, परभणी यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या