💥पालम तालुक्यातील राणी सावरगाव येथील रस्त्याची सुरू असलेली काम गुणवत्ता पुर्वक व नियमाप्रमाणे करा.....!


💥या मागणीसाठी आज शुक्रवार दि.२३ रोजी पालम तहसिल कार्यालया समोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण संपन्न💥


पालम (दि.२३ सप्टेंबर) - राणीसावरगाव रस्त्याचे दुरुस्तीची सुरू असलेले काम गुणवत्तापूर्ण करावे व  नवीन सिमेंट रस्त्यास तात्काळ बजेट मंजूर करावे  या मागणीसाठी पालम तहसील कार्यालयाच्या समोर शुक्रवारी एक दिवशीय उपोषण करण्यात आले. या उपोषणास आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर,हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे रामेश्वर भोसले पाटील यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला. कृष्णाजी भोसले आणि अमोल शिवाजी खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या