💥संतश्रेष्ठ श्री गुरूलिंग स्वामींची परळीत निघाली पालखी ; अखंड शिवनाम सप्ताहाची भक्तीपूर्ण वातावरणात सांगता...!


💥सदगुरू श्री सिद्धलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांचे आशिर्वचन ; वीरशैव लिंगायत समाज परळीचा उपक्रम💥

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) - वीरशैव लिंगायत समाज परळी व श्री गुरूलिंग स्वामी देवस्थानच्या वतीने दि.30 ऑगस्टपासून सुरू असलेल्या संतश्रेष्ठ श्री गुरूलिंग स्वामी यांच्या 121 व्या पुण्यतिथी महोत्सव व अखंड शिवनाम सप्ताहाची मंगळवार दि.6 सप्टेंबर रोजी भक्तीपूर्ण व उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली. यानिमित्त शहरातील प्रमुख मार्गावरून पालखी काढण्यात आली. शिवनामाचा एकच गजर, जागोजागी भाविकांकडून श्रीं च्या पालखीवर करण्यात आलेली पुष्पवृष्टी हे या पालखी सोहळयाचे वैशिष्टय असून कोरोनाचे दोन वर्षांचे निर्बंध शिथील झाल्याने आजच्या पालखी सोहळयाला शिवभक्तांची मोठी गर्दी झाली होती. सदगुरू श्री सिद्धलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण सोहळा पार पडला. सप्ताहात त्यांचे आशिर्वचन पार पडले. आपल्या आशिर्वचनातून महाराजांनी सामाजिक, सार्वजनिक शांततेसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत व शरीर शुद्धीकरणासाठी शिवनाम जपावे असे सांगितले.


वैद्यनाथनगरी परळी येथे बेलवाडी मंदिरात चालू असलेल्या श्री गुरूलिंग स्वामी यांचा 121 वा पुण्यतिथी सोहळा व अखंड शिवनाम सप्ताहाची मंगळवारी भक्तीपूर्ण व उत्साहात सांगता झाली. मागील सात दिवसांपासून येथे अखंडपणे शिवनाम सप्ताह व धार्मीक कार्यक्रम चालू होते. दरम्यान आज मंगळवारी सकाळी 9 वा. वैद्यनाथ मंदिर येथून संतश्रेष्ठ श्री गुरूलिंग स्वामी यांची पालखी काढण्यात आली. वक्रेश्वर मंदिर येथून पुढे शहरातील प्रमुख मार्गावरून शिवनामाचा गरज करीत पालखी मार्गस्थ होत गेली.श्री संत गुरुलिंग स्वामी महाराज पालखी सुरुवात वैजनाथ मंदिर, देशमुखपार, अंबेवेस, गणेशपार, नांदूरवेस, गोपनपाळे गल्ली, आंबेवेस, भोई गल्ली मार्गे बेलवाडी येथे प्रवचन, आरती व महाप्रसादाने सांगता झाली. जागोजागी भाविकांकडून पालखीतील श्रीं चे दर्शन करण्यासोबतच पुष्पवृष्टी केली जात होती. ओम नमः शिवायचा जप, मन्मथस्वामी व गुरूलिंग स्वामींचा जय जय जयकार जागोजागी केला जात होता. 

वीरशैव लिंगायत समाज बांधवांचा आजच्या पालखी सोहळयात सक्रीय सहभाग होता. दोन वर्षांच्या कालखंडानंतर पालखी सोहळा झाल्याने सर्वांनाच हा सोहळा भव्य दिव्य व्हावा असे वाटत होते. त्याची प्रचितीही यावेळी ठिकठिकाणी पहायला मिळाली. मागील सात दिवस अखंड शिवनाम सप्ताहात विविध धार्मीक कार्यक्रम पार पडले. दररोजची आरती आणि महाप्रसादही अखंडपणे चालूच होता. आजच्या पालखी सोहळयात वीरशैव समाजातील सर्व महिला पुरुष व सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुरुलिंग स्वामी देवस्थान चे अध्यक्ष दत्ताप्पा ईटके गुरूजी,सचिव अ‍ॅड.गिरीषअप्पा चौधरी, सदस्य प्रा.रामलिंगप्पा काटकर, रत्नेश्वरअप्पा कोरे, सोमनाथअप्पा हालगे, विजयकुमार मेनकुदळे, शिवकुमारअप्पा व्यवहारे, शंकरअप्पा उदरगीरकर, शिवशंकरअप्पा निर्मळे, अक्षय मेनकुदळे, अ‍ॅड.मंदार नरवणे व समस्त वीरशैव लिंगायत समाज बांधव व भगिनी यांनी यांनी परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या