💥पुर्णा नगर परिषदेचे धृतराष्ट्र वृत्तीचे मुख्याधिकारी लक्ष देतील काय ? बोगस कामांच्या विरोधात मागील ५ दिवसापासून उपोषण...!


💥उपोषणार्थीची प्रकृती चिंताजनक : भ्रष्ट नगर परिषद प्रशासनासह भ्रष्टाचारी गुतेदारांनाही कामाच्या फलकाची अलर्जी आहे का ?💥

परभणी (दि.११ सप्टेंबर) - पुर्णा नगर परिषदेचा कारभार 'तुम्ही करा वट वट आम्ही आहोत निब्बरगट्ट' एकंदर अश्या प्रकारचा झाला असून नगर परिषदेवर प्रशासकांची नियुक्ती झाल्यानंतर नगर परिषदेच्या कारभारात निश्चितच सुधारणा होईल अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत होती परंतु सदरील अपेक्षा अक्षरशः फोल ठरली असून प्रशासक तथा एसडीएम सुधीर पाटील यांच्या मागे प्रशासकीय कामाचा प्रचंड असा व्याप असल्यामुळे त्यांचे नगर परिषद प्रशासनाकडे संपूर्णतः दुर्लक्ष होत असल्यामुळे व मुख्याधिकारी अजय नरळे सातत्याने धृतराष्ट्रा सारखी भुमिका निभावत असल्यामुळे नगर परिषद प्रशासनातील काही भ्रष्ट अधिकारी व अनेक भ्रष्टाचारी गुत्तेदार अक्षरशः कौरवां प्रमाणे सैरभर झाल्याचे निदर्शनास येत असून कोट्यावधी रुपयांच्या विकासनिधीतून होणारी विकासकामे बोगस होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

नगर परिषद प्रशासनाकडून शहरात चार ठिकाणी एक कोटी रुपयांचे नाली व रोडकामे केली जात असून सदरील बांधकामांच्या ठिकाणी शासन मान्यते प्रमाणे नामफलक बोर्ड लावन्यात यावेत या प्रमुख मागणीसाठी अन्याय,अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समितीचे पुर्णा तालुका अध्यक्ष तथा पत्रकार मारोतीराव ढाले यांनी नगर परिषद कार्यालया समोर दि.०७ सप्टेंबर २०२२ पासुन उपोषणास प्रारंभ केले आहे. आज रविवार दि.११ सप्टेंबर २०२२ रोजी या उपोषणाचा पाचवा दिवस असुन उपोषणकर्त्याची प्रकृती गंभीर असतानाही नगर परिषद मुख्याधिकारी अजय नरळे व नगर परिषद प्रशासन मात्र धृतराष्ट्रा प्रमाणे अंधत्वाचे सोंग घेऊन भ्रष्ट गुत्तेदारांशी बंधुत्व जोपासत असल्याचे निदर्शनास येत असून उपोषण कर्त्यांच्या मागण्याकडे सपशेल दुर्लक्ष करीत असल्यामुळे संताप व्यक्त केला जात असून जर उपोषणाची तात्काळ दखल नाही घेतल्यास पूर्ण महाराष्ट्रात अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे पदाधिकारी रस्त्यावर येऊन तीव्र आंदोलन करणार असल्याचे उपोषणार्थी ढाले यांनी म्हटले आहे

पूर्णा नगर परिषद प्रशासनाने एका ठिकाणी २५ लाख रुपयाचे तर दुसऱ्या ठिकाणी २० लाखाचे आरसीसी नाली व सीसी रोडचे काम केले आहे व एक ठिकाणी पेव्हर ब्लॉकचे ३० लाख रुपयाचे काम असे चार ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत एक कोटी रुपयाचे कामे अंदाज पत्रकाच्या विशिष्ट मापदंडानुसार न करता अत्यंत निकृष्ट दर्जाची कामे करण्यात आली आहे. मुख्याधिकारी मेहरबाण तो क्या करे मलाई मेहमान अशा म्हणी प्रमाणे भ्रष्टाचारास अभियंता व मुख्यधिकारी मुक समंती देत आहेत. परंतु अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने केवळ बांधकाम झालेल्या ठिकाणी शासनाच्या नियमावली प्रमाणे नाम फलक लावण्याची मागणी केली आहे परंतु भ्रष्टाचारी गुतेदारास कामाच्या नाम फलकाची अलर्जी आहे की काय? नाम फलक लावत नसल्याने अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने बेमुदत आमरण उपोषणास बसण्यात आले आहे. आज उपोषणाचे पाचवे दिवस असतानाही उपोषण कर्त्याच्या मागण्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्या मागे दडले तरी काय अद्याप कळेनासे झाले आहे या गंभीर बाबीकडे नगरपरिषद मुख्याधिकारी, नगरपरिषद प्रशासक सुधीर पाटील व परभणीचे जिल्हाधिकारी लक्ष न देण्यामागे काही तरी फार मोठा भ्रष्टाचार लपल्याची शक्यता नाकारता येत नाही. उपोषणकर्त्याच्या मागण्याकडे तात्काळ दाखल न घेतल्यास अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रातील संघटनेचे पदाधिकारी सोमवारपासून रस्त्यावर येऊन तीव्र आंदोलन करणार व पूर्णा येथील महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने नगरपरिषदेला बांगड्याचा आहेर देणार अशी माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महमद रफी यांनी दिली. या उपोषणात पुर्णा तालुका अध्यक्ष मारोतराव ढाले, शहराध्यक्ष विजय उमप, महिला जिल्हाध्यक्षा निकिता खरे, महिला जिल्हा सचिव शोभाताई डोंगरे, शहराध्यक्षा उषाताई साळवे, तालुकाध्यक्षा शोभाताई लोखंडे, महिला शहराध्यक्षा सुचिता साळवे, महिला शहर सचिव मीनाताई चोपडे व इतर पदाधिकारी हा उपोषण यशस्वी करण्यासाठी प्रयत्नात आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या