💥पूर्णेत गोदावरी अर्बन मल्टिस्टेट बॅंकेचा उत्साहात शुभारंभ संपन्न....!


💥बँकेच्या अध्यक्षा सौ राजश्री पाटील यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडला उद्घाटन सोहळा💥

💥पत्रकारांना बँकेच्या उदघाटन सोहळ्याचे निमंत्रण देण्यास बँक प्रशासनाने केला भेदभाव ?

पूर्णा (दि.०८ सप्टेंबर) - देशातील सात राज्यात शाखांचे जाळे असलेल्या तसेच सुमारे 1600 कोटि रुपये एवढी ठेव असलेल्या नांदेड येथील गोदावरी अर्बन मल्टिस्टेट बँकेच्या पूर्णा शाखेचा उदघाटन बँकेच्या अध्यक्षा सौ राजश्री पाटील यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडला.


पूर्णेच्या मध्यवस्तीत असलेल्या अग्रवाल कॉम्लेक्स येथे ह्या शाखेचा उदघाटन पार पडले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार पल्लवी टेमकर, नगराध्यक्ष प्रतिनिधी संतोष एकलारे,राजुभय्या एकलारे,दै सकाळ चे प्रतिनिधी जगदीश जोगदंड,हनुमान अग्रवाल,सुधाकर खराटे,राजू धूत,बँकेचे मॅनेजिंग डायरेक्टर धनंजय तांबेकर,रवि जैस्वालपूर्णा शहर पत्रकार अध्यक्ष केदार पाथरकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्तिथी} होते, त्यांनी बँकेकडून पूर्णेत आर्थिक उत्कर्ष व्हावा अशा अपेक्षा व्यक्त केल्या,तर सो राजश्रीताईनी आपल्या भाषणात पूर्णेकरांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही,गरजू नागरिकांनी शाखेत संपर्क साधावा आमच्या बँकेतर्फे कुठलाही भेदभाव न करता त्यांची कर्जरूपी मदत केली जाईल असे प्रतिपादन केले.

सूत्रसंचालन प्रा.कीर्तनकार यांनी केले तर आभार बँकेचे व्यस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांनी मानले,यावेळी बँकेच्या सर्व सभासद आणि कर्मचारी वर्गाचे स्वागत करण्यात आले,यशस्वीतेसाठी बँकेचे शाखाधिकारी अरविंद महाजन यांच्यासह बँकेचे कर्मचारी आणि मार्केटिंग प्रमुख....

💥पत्रकारांना बँकेच्या उदघाटन सोहळ्याचे निमंत्रण देण्यास बँक प्रशासनाने केला भेदभाव ?

पुर्णेतील गोदावरी अर्बन मल्टिस्टेट बॅंके शाखेचा उदघाटन सोहळा उत्साहात पार पडला सदरील उदघाटन सोहळ्यास पुर्णेतील संकुचित मनोवृत्ती संस्काराला शोभेसे वर्तन अन्य राजकीय/सामाजिक/शासकीय प्रशासकीय व्यवस्थे प्रमाणेच गोदावरी अर्बन मल्टिस्टेट बँक प्रशासनाने देखील केल्याचे आज निदर्शनास आले सदरील उदघाटन सोहळ्यास काही मोजक्या मर्जीतील पत्रकार मंडळींनाच निमंत्रीत करण्यात आल्यामुळे बँक प्रशासनाला अन्य पत्रकार मंडळींची ॲलर्जी आहे काय ? असा गंभीर प्रश्न पत्रकार मंडळींमध्ये उपस्थित होत आहे..... 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या