💥मनुष्य समजून तुम्ही ज्या मनुष्यरुपी असूराला.....!


💥नालायक लोकांना सन्मान देऊन तुम्ही स्वतःचा अपमान कद्दापी करून घेऊ नका💥

✒️..परखड सत्य :- ✍🏻चौधरी दिनेश (रणजीत)

मनुष्य समजून तुम्ही ज्या मनुष्यरुपी असूराला मानुसकी दाखवता तो मुळातच मानुसकी दाखवण्याच्या लायकीचा नसतो याची प्रथमतः जाणीव ठेवा त्याच प्रमाणे तुम्ही संस्कारा प्रमाणे प्रत्येकाशी इमानदारीने वागण्याचा प्रयत्न करतात मग इमानदार असो की बेईमान....परंतु यापुढे या गोष्टीकडे विशेष लक्ष द्या तुम्ही ज्याच्या सोबत इमानदारीने वागण्याचा प्रयत्न सातत्याने करतात प्रथमतः तो इमानदार आहे काय ? तो मनुष्य इमानदार असेल तरच त्याला इमानदारी दाखवा नाही तर तो तुमच्या इमानदारपणाला तुमचा मुर्खपणा समजून तुम्हाला वेळोवेळी बदणाम करण्याचा महामुर्खपणा करेल या पुढे एक गोष्ट तुम्ही कायमची लक्षात ठेवा तुम्हाला जर या जगात स्वाभिमानाने आयुष्य जगायचे असेल तर तिन गोष्टी कायमच्या स्मरणात ठेवाव्या लागतील. 

पहीली गोष्ट म्हणजे तुम्हाला मानुसकी दाखवायचीच असेल तर तुम्ही मनुष्याला दाखवा मनुष्यरुपी असूरांना नव्हें...तुम्हाला इमानदारी दाखवायचीच असेल तर तुम्ही इमानदारालाच दाखवा इमानदारीचे ढोंग करीत बेईमानीने धनदांडगे होणाऱ्या  लबाड लांडग्यांना कद्दापी इमानदारी दाखवू नका अन् तुम्हाला तुमचा स्वतःचा सन्मान कायम ठेवायचा असेल तर अश्या मनुष्यालाच सन्मान द्या जो तुम्ही दिलेल्या सन्मानाचा सन्मानाने स्विकार करेल कारण जे लोक तुम्ही दिलेल्या सन्मानाची किंमत समजू शकत नाहीत ते लोक सन्मान देण्याच्या यत्किंचितही लायकीचे नसतात त्यामुळे अश्या नालायक लोकांना सन्मान देऊन तुम्ही स्वतःचा अपमान कद्दापी करून घेऊ नका....

✒️..परखड सत्य :- ✍🏻चौधरी दिनेश (रणजीत)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या