💥पुर्णा तालुक्यातील शिवसेना कार्यकारीणी जाहीर : शिवसेना तालुकाध्यक्ष पदावर प्रकाश कऱ्हाळे यांची निवड...!


💥तर गंगाखेड विधानसभा अध्यक्ष पदावर चंद्रकांत सुर्यवंशी : जिल्हा प्रमुख माधव कदम यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान💥पुर्णा (दि.१६ सप्टेंबर)
- परभणी जिल्हा शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख माधव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत काल गुरुवार दि.१५ सप्टेंबर २०२२ रोजी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात झालेल्या बैठकीत पुर्णा तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.


यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख म्हणून एकनाथ लोखंडे तर तालुका प्रमुख पदावर मा.शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश कऱ्हाळे,गंगाखेड विधानसभा प्रमुख म्हणून चंद्रकांत सुर्यवंशी,शिवसेना शह प्रमुख पदावर विशाल किरडे,उपतालुका प्रमुख पदावर घनशाम काळे,कैलास शिंदे,तालुका सचिव पदावर सुनिल इंगोले,तालुका संघटक पदावर नरहरी कदम,उपतालुका संघटक पदावर भास्कर सदगर,उपशहर प्रमुख पदावर गजानन कदम,उपशह प्रमुख पदावर सुबोध सोनकांबळे,उपशहर प्रमुख पदावर लक्ष्मण कदम,पुर्णा शहर सचिव पदावर शिवा पळसकर,शहर संघटक पदावर दत्ता कदम,शिवसेना मुस्लीम आघाडी शहर प्रमुख पदावर मुजम्मील खान उर्फ पाशा चाँदखान तर शिवसेना शिक्षक संघटना तालुकाप्रमुख पदावर रंगनाथ शेरकर यांची निवड करण्यात आली असून या सर्व पदाधिकाऱ्यांना शिवसेना जिल्हा प्रमुख माधव कदम यांच्या हस्ते नियुक्तीपत्र बहाल करण्यात आले........ 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या