💥येलदरी धरणाचे दहा दरवाजे सकाळी पासून तर रात्री सहा वाजे पर्यंत उघडले....!


💥नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा दिला इशारा💥

जिंतूर प्रतिनिधी/बि.डी.रामपूरकर

जिंतूर : पूर्णा नदी पाणलोट क्षेत्रात मागील २४ तासापासून सतत पडत असलेल्या पावसाने पूर्णा नदीवरील तिन्ही धरणे तुडुंब भरली आहे. खडकपूर्णाचे ९दरवाजे, येलदरीचे १०दरवाजे. त्यामुळे पूर्णा नदीला मोठा पूर आला असून नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला, आहे. मागील दोन दिवसांपासून पूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे.

          येलदरी धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे आज धरणाची सकाळी १० दरवाजे उघडण्यात आले. मात्र खडकपूर्णा धरणाच्या १९ दरवाज्यातून ४४ हजार ४०८ क्यूसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. येलदरी धरणाचे सर्व सर्वचा दरवाजे उघडण्यात आले असून ३०हजार ९६८ क्यूसेक्स विसर्ग पूर्णा नदी पात्रात सोडला आहे. विसर्ग वाढल्याने पूर्णा नदीकाठच्या गावांना पाटबंधारे विभागाचे अधिकार बी. के शिंदे, खडकपूर्णा प्रकल्पाचे प्रकल्प निरीक्षक राहुल गुंजाळ यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे.

        दरम्यान, खडकपूर्णा आणि येलदरी धरणातून प्रचंड प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने सिद्धेश्वर धरणाचा साठा वाढला आहे. सिद्धेश्वरचे सर्व १४ दरवाजे उघडून विसर्ग करण्यात आला. त्यामुळे पूर्णा नदीला महापूर आला आहे. पूर्णा प्रकल्पाचे ही तिन्ही धरणे मागील चार वर्षांपासून तुडुंब भरत आहेत. त्यामुळे भविष्यातील पाणी टंचाईच्या समस्या दूर होणार असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. या दरम्यान सकाळी ६ :०० वा. येलदरी- सेनगाव महामार्गावरील, पूर्णा नदीवरील पूल हे पाण्याखाली गेल्याने या महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. नागरिकांनी हिंगोली येथे जाण्यासाठी जिंतूर-औंढा या पर्यायी मार्गाचा वापर करावा. असे आव्हान पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या