💥संस्कारमय विद्यार्थी घडवण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना एक उत्तम माध्यम - डॉ.प्रकाश सुर्वे



💥श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस साजरा💥 

पूर्णा (दि.२५ सप्टेंबर) - येथील श्री गुरु बुद्धिस्वामी  महाविद्यालय पूर्णा येथे '24 सप्टेंबर' हा राष्ट्रीय सेवा योजना स्थापन दिन म्हणून साजरा करण्यात आला याप्रसंगी कला वाणिज्य महाविद्यालय गंगाखेड येथील कार्यक्रमाधिकारी व प्राणीशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.प्रकाश सुर्वे उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रीय सेवा योजना हे सेवा करण्याचे एक माध्यम आहे.


या माध्यमातून समाजसेवा करण्याची आवड निर्माण केली जाते सर्वांगीण व शाश्वत विकास साधावयाचा असेल तर  राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून रस्ते बांधणी, पाणी आडवा, पाणी जिरवा ,वृक्षारोपण, रक्तदान ,श्रमदान , पथनाट्य ,रॅली, उद्बोधन शिबिर फेरी,ग्रामीण भागातील जनतेशी संवाद  यासारख्या वेगवेगळ्या उपक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असतो. या माध्यमातून राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात युवाशक्ती व ऊर्जास्तोत्र पुरविण्याचे कार्य राष्ट्रीय सेवा योजना करीत असते. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागां अंतर्गत प्राचार्य डॉ के राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ संजय दळवी होते. अध्यक्षीय समारोप करताना डॉ संजय दळवी यांनी विद्यार्थ्यांचे सामाजिक जाणीवा विकसित होण्यासाठी  एन एस एस ची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉ. पुष्पा गंगासागर यांनी केले. डॉ ओमकार चिंचोले यांनी सुत्रसंचलन केले तर आभार डॉ. प्रकाश भांगे यांनी मानले. सदरील कार्यक्रमास   महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक , शिक्षेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या