💥पुर्णा तालुक्यातील अन्नदाता शेतकरी दुहेरी संकटात : निसर्गाच्या लहरीपणाने पळवला तोंडचा घास....!


💥तालुका कृषी विभाग व महसुल प्रशासनाला ना ओल्या दुष्काळाची जान...ना कोरड्या दुष्काळाचे भान ?💥 


पुर्णा (दि.१० सप्टेंबर) - तालुक्यातील अन्नदाता शेतकऱ्यांवर सातत्याने आसमानी संकट कोसळत असतांना शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शासन दरबारी खंबीरपणे आवाज उठवणारा एक तरी लोकप्रतिनिधी जिल्ह्यात उरला की नाही ? असा गंभीर प्रश्न जनसामान्यांसह अन्नदाता शेतकरी बांधवांमध्ये उपस्थित होत असून तालुक्यात मागील १५ जुलै ते ०५ आगष्ट २०२२ या तब्बल विस दिवसाच्या कालावधीत तालुक्यात सतत मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदी नाल्यांसह ओढ्यांच्या काठावरील शेतकऱ्यांसह अन्य शेतकऱ्यांचे देखील अतिवृष्ठी मुळे खरीप हंगामातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यावेळी शेतकऱ्यांसह शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे टाकलेल्या प्रहार जनशक्ती पक्ष तसेच तालुका वकील संघाकडून निवेदनाव्दारे अतिवृष्ठीमुळे झालेल्या नुकसानीची महसुल प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून शासनाला अहवाल सादर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल या दृष्टीने पाऊल उचलावी अशी मागणी करण्यात आली परंतु तहसिलदार टेमकर यांच्यासह महसुल प्रशासन व तालुका कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी बेजवाबदार पणाचा प्रत्यय देत वेळकाढू धोरण अवलंबले यानंतर ०५ आगष्ट ते ०७ सप्टेंबर २०२२ तब्बल बत्तीस दिवस पावसाने दडी मारली त्यामुळे उर्वरीत असंख्य शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन,कापूस,मुग,उडीद आदी खरीप हंगामातील पिकांसह फळ/भाजीपाला आदी पिकांचे सुकून मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतांना सदरील उभी पिक वाळतांना पाहून शेतकऱ्यांना अश्रू अनावर होत असतांना व कोरड्या दुष्काळासारखी भयंकर परिस्थिती निर्माण झाली असतांना मात्र तालुका कृषी विभागासह महसूल प्रशासनातील निर्दयी निर्लज्ज अधिकारी/कर्मचारी आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ न राहता पुन्हा वेळकाढू धोरनाचा अवलंब करीत बसल्या जागेवर अनेक मंडळातील अहवाल निरंक पाठवत अन्नदात्या शेतकऱ्यांवर अक्षरशः सुड उगवत असल्याचे पाहावयास मिळत असल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तिव्र असंतोष पसरला असून तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या पिकविम्यासह शासनाकडून नुकसान भरपाई वेळेवर मिळाली नाही तर तालुक्यात येणाऱ्या काळात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही असे जर झाले तर शेतकऱ्यांच्या आत्महत्येस सर्वस्वी तालुका कृषी विभागासह महसुल प्रशासन देखील जवाबदार राहणार असून तालुक्यात प्रथमतः १५ जुलै ते ०५ आगष्ट २०२२ या काळात ओला दुष्काळ सदृष्य परिस्थिती तर नंतर ०६ आगष्ट ते ०७ सप्टेंबर २०२२ या काळात कोरडा दुष्काळ सदृष्य परिस्थिती अश्या निसर्गाच्या लहरीपणा मुळे तालुक्यातील अन्नदाता शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून तालुका कृषी विभाग व महसुल प्रशासनाला ना ओल्या दुष्काळाची जान...ना कोरड्या दुष्काळाचे भान ? असल्याचे पाहावयास मिळत आहे......  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या