💥पूर्णेत शिवसेना गणेश फेस्टिवलचे बक्षिस वितरण संपन्न....!


💥खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्या हस्ते पारितोषिक प्राप्त गणेश मंडळांना बक्षिसांचे वितरण💥


पूर्णा (दि.१२ सप्टेंबर) - शिवसेना शहरप्रमुख संकेत उर्फ मुंजाभाऊ कदम यांच्या मुख्य संयोजनाखाली संपन्न झालेल्या पूर्णा शिवसेना गणेश फेस्टिवलचा पारितोषिक वितरण सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला या गणेश फेस्टीवल स्पर्धेत अनेक गणेश मंडळांनी अक्षरशः दिड ते दोन लाख रुपयांची पारितोषिके यावेळी पटकावली तर यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित खासदार जाधव यांनी गणेश मंडळातील कार्यकर्त्यांना स्वतःकडून नगदी स्वरूपात हजारोंची बक्षिसे प्रदान करून त्यांना प्रोत्साहन देत सन्मानित केले.


शिवसेना पुर्णा शहरप्रमुख संकेत कदम यांच्या शिस्तबद्ध  नियोजनातून पार पडलेल्या या फेस्टिवल मध्ये छत्रपती शिवाजी महाराज गणेश मंडळ,श्रीकृष्ण गणेश मंडळ,ओम गणेश मंडळ,आनंदनगर गणेश मंडळ,महावीर गणेश मंडळ,राजस्थान गणेश मंडळ,वाल्मिक गणेश मंडळ,त्रिशूल गणेश मंडळ,स्वस्तिक गणेश मंडळ आदी मंडळांनी बक्षिसांची लयलूट केली,त्यांच्या देखाव्यानी लोकांचे लक्ष वेधून घेतले होते, स्थानिक देखावा,धर्मिक देखावा,उत्कृष्ठ गणेशमूर्ती,शांततापूर्ण गणेश मंडळ,सामाजिक देखावा,आदी प्रकारातील बक्षिस वितरण करण्यात आले.


कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार संजय उर्फ बंडू जाधव,शहरातील सर्वधर्मिय सर्व समाजातील लोकप्रिय नेतृत्व तथा नगराध्यक्ष प्रतिनिधी संतोष एकलारे,पुर्णा पोलिस स्थानकाचे कर्तव्यतत्पर अधिकारी पो.नि.सुभाष मारकड,शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम,डॉ विनय वाघमारे,राजू एकलारे साहेबराव कदम,प्रा गोविंद कदम,मा. शहरप्रमुख बंटी कदम,ॲड.राज भालेराव,रवी जैस्वाल,शामराव कदम,शिवव्यख्याती आरोही खंदारे आदींसह मान्यवर उपस्तिथ होते,यावेळी बाल व्याख्याती कु.खंदारे हिने आपल्या कणखर आवाजात छत्रपतींचे कार्य विशद केले.


कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी शहरप्रमुख मुंजा उर्फ संकेत कदम यांच्या नेतृत्वाखाली प्रा.जगन्नाथ कदम,ज्ञानोबा कदम,प्रा.दत्ता कदम, विनायक कदम,पप्पू कदम,कृष्णा कदम,गोपाळ कदम,बाला कदम,अंकित कदम,विष्णू कदम,विशाल कदम,बालाजी सुर्वे,अक्षय काहाते,सोम शिराळे, विकास वैजवाडे, विद्यानंद तेजबंद आदींसह शिवसेना युवासेना पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या