💥पुर्णेत पाऊसाच्या उघडीपीने वाळलेले सोयाबीन तहसीलदारांना अर्पन.....!


💥कुंभकर्ण झोपेत असलेल्या तालुका कृषी विभागासह महसुल प्रशासनाला जागविण्याचा प्रहार जनशक्ती पक्षाचा प्रयत्न💥 

पूर्णा (दि.०६ सप्टेंबर) :- जिल्ह्यासह पूर्णा तालूक्यातील शेत शिवारात जुलै- ऑगस्ट २०२२ या महिन्यात सातत्याने दिड महिना जोरदार अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे पन्नास टक्यांपेक्षाही अधिक यंदाच्या खरीप हंगामातील सर्व पिके बाधीत होवून नेस्तनाबूत झाली. आणि आता गेल्या बावीस दिवसापासून पाऊसाने एकदमच कमालीची उघडीप दिली आहे.त्यामुळे काही प्रमाणात अतिवृष्टीत कसे बसे तग धरुन उभे असलेली सोयाबीन, कापूस,तूर, ज्वारी ही पिके सुकून वाळून जात आहेत. गत महिनाभरापासून दररोजच दिवसा कडक उन्हं आणि रात्री आकाशात पडणारे टिपूर चांदणे शेतक-याची चिंता वाढवीत आहे.


सध्या जिल्ह्यातील काही मंडळे सोडलीतर अधिकाधिक मंडळात विशेष करुन पूर्णा तालूक्यातील सर्व महसूल मंडळात कोरडा दुष्काळ पसरला आहे.सोयाबीन पिके सुकून वाळून जात आहेत.तरीही कृषी व महसूल खात्यातील अधिकारी कुंभकर्ण झोपेतच असून मोजक्याच क्षेत्राची पाहणी करुन वरिष्ठ महसूल अधिका-याकडे बाधीत माहिती पाठवण्यात आली आहे.नेमून दिलेल्या समितीतील तलाठी,कृषी साह्यक, ग्रामसेवकांच्या टिमने प्रत्येक शिवार फिरुन न पाहता मनमानी पध्दतीने बाधित पिकाची पाहणी पंचनामा अहवाल तयार केला गेला जावून तो गुप्त रीत्या पाठवून सरकारची पाठराखण करीत शेतक-यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यामुळे अतिवृष्टी आनूदानापासून उर्वरित सर्व शेतकरी वंचित राहणार आहेत. याचे गांभीर्य घेऊन शेतक-यांची आणि गोरगरीब जनतेची बुलंद तोफ असलेल्या माजी मंत्री आमदार बच्चू भाऊ कडू प्रणित  प्रहार जनशक्ती पक्षाच्या पूर्णा तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या व शेतक-यांच्या वतीने तारीख ६ सप्टेंबर २०२२ रोजी पूर्णा तहसीलदार यांना वाळलेले सोयाबीन अर्पन करण्यासाठी पूर्णा तहसील कचेरीवर जाऊन निवेदन देण्यात आले .व जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर येणाऱ्या काळात प्रहार जनशक्ती पक्ष तहसील कार्यल्यावर भव्य गाडी मोर्च्या काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला या प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हा प्रमुख नरेश जोगदंड.तालुका प्रमुख शिवहार सोनटक्के मंचक कुऱ्हे.श्रीहरी इंगोले. गजानन कुऱ्हे व तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या