💥कौसडी ते जिंतूर मानव विकासची पुन्हा एक बस सुरू करण्याची टिपू सुलतान युवा मंच ची मागणी....!


💥तहसीलदार,गटशिक्षणाधिकारी व आगार प्रमुखांना दिलेले निवेदन💥

 जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर तालुक्यातील कौसडी येथून शेकडो विद्यार्थीनी बोरी जिंतूर शहराकडे शिक्षण घेण्यासाठी दररोज ये-जा करत आहे. या विद्यार्थिनीसाठी कौसडीसह इतर गावावरून बोरी ते जिंतूर पर्यंत जिंतूर आगार डेपो ची एक मानव विकास बस सुरू आहे. परंतु ही बस विद्यार्थिनीसाठी अपुरी पडत असल्याने विद्यार्थिनीचे हाल होत आहे. यामुळे हजरत टिपू सुलतान युवा मंचने मानव विकास ची पुन्हा एक बस सुरू करण्याची मागणी गटशिक्षणाधिकारी गाजरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

* गटशिक्षणाधिकारी यांनी दीले आश्वासन :-

कौसडी येथील अल्पसंख्यांचे 15 ते 20 विद्यार्थिनी जिंतूर येथील महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येत आहे.  विद्यालयाचे वेळ सकाळी सात वाजता असून मानव विकास ची बस सकाळी सात वाजता कौसडी बस स्थानकावरून निघत असल्याने हे विद्यार्थिनी महाविद्यालयात एक तास विलंब पोहोचतात यामुळे त्यांचा शैक्षणिक नुकसान होत आहे. पुन्हा एक सुरू करण्यात येणाऱ्या मानव विकास बसचा वेळ कौसडी येथून सहा ते साडेसहा वाजता निघण्याचा असला पाहिजे अशी ही मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर हजरत टिपू सुलतान युवा मंचचे परभणी जिल्हाध्यक्ष शेख नईमोद्दीन कौसडीकर ग्रामपंचायत सदस्य समीर खान  पठाण, साजिद खान पठाण, फिरोज खान पठाण यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या