💥बदलत जाणारे गाव ते माझेच..!


💥.....अजून काय हवं...शेवटी गाव माझे आहे💥

✍🏻कवी :- प्रतीक्षा आंबोरे.....

कसे शब्दात मांडू, हा प्रश्न आहे

उंच माळरानावर जाऊन पाहिले तर,

चहूबाजूने सौंदर्य आणि मधोमध दाट वसलेली वस्ती आहे

सोबतच बारमाही पाण्याचे तळे आहे

त्याच्या बाजूला झाडांवर पांढऱ्या कोकिळेचा रात्रीचा निवारा आहे

दिवस मावळताच खूलणारे, एक मनमोहक दृश्य आहे

मावळत्या सूर्याबरोबर, पक्षांची घराकडे जाणारी वर्दळ आहे

रानातून सांझ पावली येणारी गुरे आहेत

अनेक दैवतांची उंच उंच शिखरे आहेत

दररोज न चुकता कानावर पडणारी अल्लाची हाक आहे

माणसांच्या तर इमारती टॉवरला भिडणार्‍या आहेत

आम्ही मात्र पूर्वजांनी बांधलेल्या कपारींच्या सुंदर ,रेखीव, सुरेख अशा जुन्या वाड्यात आहोत

गाव हे फार विकसनशील झाले हो,तालुक्याला भिडले म्हणे

शहरे तर अनेक आहेत

पण,तो दरवळणारा सुगंध माझ्याच गावच्या मातीत आहे

इथली वारे ओळखीची आहेत

पाण्याची चव तर श्वासात आहे

जुनी वाट चालतांना बोलणारी,अनेक हसमुख चेहरे आहेत

मानवनिर्मित अनेक कलाकौशल्य आहे

शान ,शौक ,मौज ,मजा शहरीकरणाचा अर्धा वर्तुळ आहे 

निरखून पाहिले तर सांगायला नको सारेच काही आहे!

हाकेला माणसांची साथ,

संगतीला पक्षांचे गीत,

प्रत्येक दिशेला वाट दाखवणारी आपुलकीची माणसे आहेत 

अजून काय हवं!

शेवटी गाव माझे आहे.

✍️कवीता :-  प्रतीक्षा आंबोरे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या