💥पुर्णेतील बालवाडी शिक्षिकांसह मदतनिसांचे ३९ महिन्यांचे वेतन थकीत : मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन.....!


💥तात्काळ वेतनाची थकीत रक्कम देण्याच्या मागणीसाठी शिक्षिका/मदतनिसांनी दिला आमरण उपोषणाचा इशारा💥

पुर्णा (दि.१६ सप्टेंबर) - पुर्णा नगर परिषद प्रशासनाचा गलथान कारभार पुन्हा एकदा उजेडात आला असून नगर परिषद प्रशासनाने बालवाडी शिक्षिकांसह मदतनिसांचे मागील तिन वर्षापूर्वी एप्रिल २०१९ पासून तब्बल ३९ महिन्यांचे वेतन दिलेच नसल्यामुळे बालवाडी शिक्षिकांसह मदतनिसांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आल्यामुळे शेवटी नाईलाजास्तव नगर परिषद मुख्याधिकारी अजय नरळे यांना लेखु स्वरूपात निवेदन देऊन आपल्या न्यायिक मागणीसाठी आमरण उपोषणाचा इशारा द्यावा लागला.

पूर्णा नगर परिषद प्रशासना अंतर्गत चालणाऱ्या बालवाडीतील शिक्षिकांसह मदतनिस (सेविकांनी) दि.०८ सप्टेंबर २०२२ रोजी नगर परिषद मुख्याधिकारी नरळे यांना दिलेल्या निवेदनात असे नमुद केले आहे की दि.०७ सप्टेंबर २०२२ रोजी पत्र देऊन कळविण्यात आले की सुवर्ण जयंती शहरी रोजगार अंतर्गत बचत गटांच्या माध्यमातून व नगर परिषद मार्फत बालवाडी शिक्षिका,सेविका म्हणून काम करणे बाबत आपणास कळविण्यात आले होते तथापी सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना बंद झाली आहे तसेच आपणास संदर्भ क्र.०२ नुसार नगर परिषद आपणास वेतन अदा करू शकत नाही असे कळवण्यात आले आहे.

या संदर्भात बालवाडी शिक्षिका/सेविका यांचे म्हणने आहे की जेव्हा आम्हाला कामावर रुजू होण्यास आदेशीत करण्यात आले तेव्हा मा.अध्यक्ष व शिक्षण सभापती यांच्या आदेशानुसार तसेच पुर्णा नगर परिषदेच्या सर्वसाधारण ठरावानुसार आम्हाला रुजू करून घेण्यात आले व नगर परिषद फंडातून व नगर परिषद कर वसुलीतून आमचे मानधन नियमित अदा होत होते परंतु एप्रिल २०१९ पासून ते आजपर्यंत तब्बल ३९ महिन्यांचे मानधन थकीत आहे यापुर्वी ज्या पध्दतीने आमचे मानधन देण्यात येत होते त्याच पध्दतीने आमचे मानधन लवकरात लवकर देण्यात यावे तसेच आपण दिलेल्या पत्रानुसार संदर्भ क्र.०२ न.प.पु.जा.क्र.०२/२०१७/२०२१ दि.१२ जानेवारी २०२१ रोजी हे अद्याप पर्यंत आम्हा माहीतच नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले असून संबंधित शिक्षिका व मदतनिस (सेविका) नगर परिषद कार्यालयामध्ये कार्यालयीन कामासाठी येतात परंतु मागील काही दिवसापासून हजेरी नोंद वही सही करण्यासाठी संबंधित शिक्षिकांसह मदतनिस सेविकांना सापडत नसल्यामुळे नगर परिषद प्रशासनाने हजेरी नोंद वही जाणीवपूर्वक गायब केल्याचेही निदर्शनास येत असल्यामुळे सही करण्यासाठी हजेरी नोंद वही नगर परिषद प्रशासनाने उपलब्ध करून द्यावी असेही निवेदनात म्हटले असून निवेदनात पुढे असे नमूद करण्यात आले आहे मुख्याधिकारी साहेबांनी आमच्या सेवेकडे विशेष लक्ष देऊन अर्जानुसार आमचे प्रश्न सहा दिवसात पुर्णत्वास न्यावे अन्यथा नाईलाजास्तव दि.१५ सप्टेंबर २०२२ रोजी आम्हाला आमरण उपोषणास बसावे लागेल असा इशारा देखील देण्यात आला होता परंतु मुख्याधिकारी अजय नरळे यांनी संबंधित शिक्षिका व मदतनीस सेविकांच्या अर्जाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे त्या नगर परिषदे पुढे उपोषणास बसल्या असून या उपोषणाचा आज शुक्रवार दि.१६ सप्टेंबर २०२२ रोजी दुसरा दिवस असतांना देखील नगर परिषद प्रशासन त्यांचे प्रश्न सोडवने तर दुरच त्यांच्याशी चर्चा करण्यास देखील तयार नसल्यामुळे संताप व्यक्त होत आहे

नगर परिषदे समोर उपोषणास बसलेल्या शिक्षिका व मदतनिस सेविकांमध्ये गया किशनराव कदम,सुनिता मारोती भिसे,अनिता सखाराम सुर्यवंशी,शाहीन बानो छोटे खान,शबाना बेगम फजलुल रहेमान आदींचा समावेश आहे...... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या