💥पुर्णा तालुक्यात तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या...!


💥सामाजिक कार्यकर्ते संतोष कऱ्हाळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली मागणी💥 

पुर्णा (दि.०५ सप्टेंबर) - तालुक्यातील सर्व मंडळात मागील विस/बावीस दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील सोयाबीन,कापूस,तुर,मुग,उडीद आदी पिकांसह अन्य बागायती पिक व भाजी/फळे आदी पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून पावसा अभावी पिक अक्षरशः कडक उन्हामुळे वाळून गेली आहेत.

त्यामुळे पुर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून शेतकऱ्यांकडे शेतीशिवाय उपजिवीकेसाठी दुसरे कोणतेही साधन नाही निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांवर अक्षरशः आत्महत्येची वेळ आली असल्यामुळे राज्य शासनाने पुर्णा तालुका हा 'कोरडा दुष्काळग्रस्त' जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत जाहीर करून शेतकऱ्यांना या दुःखातून तात्काळ बाहेर काढावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष कऱ्हाळे व विश्वनाथ बनसोडे यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे आज रविवार दि.०५ सप्टेंबर २०२२ रोजी नायब तहसीलदार मस्के यांच्या मार्फत राज्य शासनाकडे केली असून या निवेदनावर 

सामाजिक कार्यकर्ते संतोष कऱ्हाळे,विश्वनाथ बनसोडे, पंकज कऱ्हाळे,बालाजी डफुरे,दिपक भोसले,छत्रपती कऱ्हाळे,करण कऱ्हाळे,ज्ञानेश्वर ठोके,उद्धव कऱ्हाळे, युवराज कऱ्हाळे आदी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या