💥दिपावली पर्यंत उत्सव विशेष रेल्वे गाड्यांना चालविण्यात यावे.....!


💥मराठवाडा रेल्वे प्रवाशी महासंघाने नांदेड विभागातील अतिरिक्त महाप्रबंधक आर.के.मीना यांच्याकडे केली मागणी💥

गणेशोत्सव पासून दीपावली पर्यंत होणारी गर्दी लक्षात घेता पुणे, औरंगाबाद, गोवा, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, हुबळी इत्यादी शहरांना जोडणाऱ्या नवीन उत्सव विशेष गाड्यांना चालविण्याची मागणी मराठवाडा रेल्वे प्रवाशी महासंघाच्या सदस्यांनी नांदेड विभागातील नव नियुक्त अतिरिक्त महाप्रबंधक आर. के. मीना यांच्याकडे केली. त्यात प्रामुख्याने रात्री सुमारे १० वाजता नांदेडहून निघणारी नांदेड-पुणे उत्सव विशेष रेल्वे चालविण्यात यावी, नांदेड-औरंगाबाद दरम्यान दैनंदिन रेल्वे पूर्ववत सुरू करावी, सोबत मराठवाडा विभागचा नागपूरशी संपर्क तोडला गेला असून, हिंगोली मार्गे औरंगाबाद-नागपूर दैनंदिन नवीन रेल्वे सुरू करावे. तसेच बेंगलूरू-नांदेड दैनंदिन रेल्वेला नागपूर पर्यंत वाढवण्यात यावे, अमरावती-पुणे एक्सप्रेसचे लूज टाईम रद्द करून पूर्ववत सुरू करण्यात यावे, सोबत गोवा, सोलापूर, कोल्हापूर, बिकानेर, वाराणसी इत्यादी शहरांना जोडणाऱ्या नवीन रेल्वे गाड्यांची सुविधा उपलब्ध  करुन देण्याची मागणी करण्यात आली.

आमच्या मागण्यांची दखल घेत अतिरिक्त महाप्रबंधक यांनी  नांदेड-पुणे रेल्वेचा किमान दोन तासाचा लूज टाईम रद्द करून दुपारी ३.३० च्या ऐवजी सायंकाळी ५.३० च्या दरम्यान सोडण्याची हमी दिली. मुख्य वाणिज्य प्रबंधक जय पाटील यांनी  नांदेड-औरंगाबाद दैनंदिन रेल्वेला पूर्ववत सुरू करण्याची ग्वाही दिली. पंढरपूर मार्गे नांदेड-हुबळी किंवा नांदेड-गोवा दरम्यान नवीन रेल्वे चालविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. नांदेड विभागात सवारी गाड्यांना पूर्ववत सुरू करावे आणि दक्षिण-मध्य रेल्वे विभागात इतर विभागाप्रमाणे किमान टिकटाचे भाडे ३० रूपये वरून १० रूपये पर्यंत कमी करण्याची मागणी मराठवाडा रेल्वे प्रवाशी महासंघाचे अरुण मेघराज प्रा. सुरेश नाईकवाडे, नारायणराव अकमर, रविशंकर जोशी, कादरीलाला हाशमी, इत्यादींनी केली आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या