💥पुर्णा शहरात मुख्य बाजारपेठेसह विविध परिसरात रहदारीच्या रस्त्यांवर मोकाट जनावर अडवताय मनुष्याची वाट.....!


💥मनुष्यप्राणी शोधतोय सुखासूखी घरी जाण्यासाठी मोकळी वाट ? मोकाट जनावरांवर मेहेरबान प्रशासनाचा मात्र कुंभकर्णी थाट💥


💥मोकाट जनावरांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची काँग्रेस शहर उपाध्यक्ष पांडुरंग कदम यांची मागणी💥

पुर्णा (दि.२७ सप्टेंबर) - शहरासह संपूर्ण तालुक्यात मोकाट जनावरांनी अक्षरशः धुमाकूळ घातल्याचे निदर्शनास येत असून परिसरातील शेतकऱ्यांसह नागरिक देखील या मोकाट जनावरांच्या त्रासाला वैतागले असून या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्या संदर्भात शेतकऱ्यांसह नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी देऊन देखील पुर्णा तहसिल प्रशासनासह पुर्णा नगर परिषद प्रशासन देखील तक्रांरींची दखल घेत नसल्यामुळे कुंभकर्णी झोपेतल्या प्रशासनाला शेवटी जागवायचे तरी कशे ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.शहरातील मुख्य बाजारपेठ,शैक्षणिक संस्था,महाविद्यालय,तहसिल,नगर परिषद,रेल्वे स्थानक,बसस्थानक आदी परिसरांसह शहरातील मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरांच्या अर्थात गाई/बैल/गाढव/डुकर आदी जनावरांच्या झुंडीच्या झुंडी धुमाकूळ घालीत रहदारीला अर्थळे आणत असून यात गाढवांनी तर इतका भयंकर उपद्रव माजवला आहे ही गाढव अक्षरशः सैराट होऊन एकमेकांवर कुरघोडी करीत असल्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या महिला अबालवृध्द शाळकरी विद्यार्थी विद्यार्थीनींना रस्त्याने वावरणे अवघड झाले असून ही मोकाट जनावर रस्त्याच्या बाजुला झाल तर ठिक नसता सरळ तुडवून पुढे जात असल्यामुळे अनेक अपघात देखील घडतांना पहावयास मिळत असून या जनावरांमुळे अनेक दुचाकीस्वार पडून जखमी होतांना पहावयास मिळत आहेत.

या मोकाट जनावरांचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा याकरिता पुर्णा शहर काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष पांडुरंग देविदासराव कदम यांनी नगर परिषद मुख्याधिकारी अजय नरळे यांना दि.२१ सप्टेंबर २०२२ रोजी लेखी स्वरुपात अर्ज दिला असून यापुर्वी देखील अनेकांनी या मोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी अर्ज दिले परंतू त्या अर्जांवर अद्याप पर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही त्यामुळे एकंदर परिस्थितीचा विचार केल्यास शहरात मुख्य बाजारपेठेसह विविध परिसरात रहदारीच्या रस्त्यांवर मोकाट जनावर अडवताय मनुष्याची वाट अन् मनुष्यप्राणी शोधतोय सुखासूखी घरी जाण्यासाठी मोकळी वाट ? मोकाट जनावरांवर मेहेरबान प्रशासनाचा मात्र कुंभकर्णी थाट..अशी अवस्था झाल्याचे निदर्शनास येत आहे........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या