💥परभणी जिल्ह्यात तब्बल पाचशेच्यावर नियमाबाह्य शिक्षक भरती ?


💥शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे व श्रीमती गरूड यांच्यावर ४० कोटीचा अपहार केल्याचा आरोप💥 

💥राज्य सरकारला बसणार तब्बल ९० हजार कोटीचा फटका : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रकरणाची चौकशी करणार काय ?💥

परभणी (दि.१० सप्टेंबर) - परभणी जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राचे बाजारीकरण करीत तब्बल ५०० च्यावर शिक्षकांच्या नियमाबाह्य पध्दतीने भरत्या करीत शिक्षक भरतीच्या माध्यमातुन जिल्हा परिषद शिक्षण विभागातील प्राथमिक माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती आशा गरूड व विठ्ठल भुसारे यांनी वैयक्तिक मान्यता सेवासातत्य देऊन तब्बल ४० कोटीचा अपहार केला खरा पण नियमाबाह्य शिक्षकांच्या पगारासाठी राज्य सरकारला दरवर्षी ३०० कोटी तर शिक्षकांचा सेवा निवृती पर्यत ९० हजार कोटी रुपयांचा अफाट खर्च करावा लागणार आसल्याची शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी धक्कादायक माहिती समोर आली असून अपाञ शिक्षकांच्या नियुक्तीं मुळे गुणवंत शिक्षकावर एक प्रकारे अन्यायच झाला असल्याचे बोलले जात आहे.  

संपूर्ण महाराष्ट्रात परभणी जिल्हा परीषदेचा शिक्षण विभागाने भ्रष्टाचारात प्रथम क्रमांक मिळवला आसून मंञालय मुंबईत आहे पण शिक्षण विभागाने परभणीतच मंञालयाचे कामकाज सुरू केलेले उघड झाले शिक्षण विभागाने थेट शालेय शिक्षण व क्रिडा विभाग सचीवाचे सही निशी पञे तयार करण्याचे कामकाज सुरू करून शासनाची फसवणूक करण्याचा प्रकार उघड झाला याचे गंभीर परीणाम काही दिवसातच उघड होणार आहेत जिल्हा परीषद शिक्षण विभागातील भ्रष्ट शिक्षणाधिकारी श्रीमती आशा गरूड व विठ्ठल भुसारे यांनी नियमाबाह्य शिक्षक भरतीच्या माध्यमातून ४० कोटीचा अपहार केला पण नियमाबाह्य शिक्षक भरती करण्यात आलेल्या शिक्षकांना देण्यात येणाऱ्या पगारावर ईडी सरकारला ३०० कोटीच्यावर खर्च करावा लागणार आहे.हा प्रकार म्हणजे शासनाची उघडपणे लूट करणारी आहे.जिल्हात अनेक गुणवंत शिक्षक आजही बेरोजगार आसून केवळ त्यांचा कडे संस्थेना देण्यासाठी डोनेशन नसल्याने इतर कामे करून उदरनिर्वाह करीत आहे.जिल्हा परीषद शिक्षण विभागातील तत्कालीन प्राथमिक उप शिक्षणाधिकारी आत्ताचे प्राथमिक शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे या नियमाबाह्य शिक्षक भरतीचे सुञधार आसुन त्यांना भ्रष्ट माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती आशा गरूड यांची खंबीर साथ मिळाली आहे.श्रीमती गरूड यापूर्वी परभणी शिक्षण विभागात प्राथमिक शिक्षणाधिकारी पदावर आसताना जिल्हातील खाजगी शिक्षण संस्थेच्या प्राथमिक विभागात मोठ्या प्रमाणात नियमाबाह्य शिक्षक भरतीस मान्यता देत अपाञाना वैयक्तिक मान्यता सेवासातत्य देऊन कोट्यावधीचा अपहार केला आहे. प्राथमिक विभागातून २०० च्यावर नियमाबाह्य शिक्षक भरतीच्या संचीका बेपत्ता झालेल्या आहेत तर जावक नोंदीचे रजीष्ठर सिओ यांनी आपल्या ताब्यात घेवून रोज याची पुजा करीत आहेत काय?असा यक्ष प्रश्न निर्माण होत आहे.आत्ताचे प्राथमिक शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांच्याकडे माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा पदभार आसताना अपाञाना जिल्हातील शिक्षण संस्थेत वैयक्तिक मान्यता सेवा सातत्य देऊन कोट्यावधी रूपायाची कमाई भ्रष्ट मार्गाने केली आहे.भ्रष्ट विठ्ठल भुसारे यांनी चक्क बनावट शालेय शिक्षण व क्रिडा विभाग अवर सचीव यांचे पञ तयार करून या पञाचा वापर गैरमार्गाने केल्याचे उघड झाले आहे.प्राथमिक माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती आशा गरूड विठ्ठल भुसारे यांनी जिल्हात केलेल्या नियमाबाह्य शिक्षक भरतीच्या माध्यमातून 500 च्या वर शिक्षकांना देण्यात येणाऱ्या वेतना पोटी परभणी शिक्षण विभागास दरमाह २५ कोटी तर वर्षास ३०० कोटीचा तर सेवानिवृती पर्यत ९० हजार कोटीचा गंडा ईडी सरकारला बसणार आहे या वेतनात टिऐडिऐ सातवा वेतनाची भर पडल्यास वाढ होईल.भ्रष्ट शिक्षणाधिकारी श्रीमती आशा गरूड विठ्ठल यांच्या ४० कोटीचा स्वार्थासाठी ईडी सरकारला कोट्यावधी नव्हे तर आब्जोवधीचा फटका बसणार आहे....   टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या