💥पुर्णेतील केंद्रीय कन्या शाळेत आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक आबनराव पारवे यांचा सत्कार समारंभ....!


💥केंद्रिय मुख्याध्यापक श्रीमती रेखाताई जोंधळे यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आला सत्कार💥

परभणी जिल्हा परिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्काराचे यंदाचे मानकरी तसेच सतत नवनवीन उपक्रम राबवत विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्याचा ध्यास घेतलेले फुकटगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक आबनराव पारवे यांचा सत्कार केंद्रीय कन्या शाळा पुर्णा येथे एका कार्यक्रमात करण्यात आला.

केंद्रिय मुख्याध्यापक श्रीमती रेखाताई जोंधळे, सहशिक्षक अनंता भोकरे,शामराव खोंडे, बाबासाहेब काशीदे, सूर्यवंशी मॅडम,श्रीमती दासरवार, श्रीमती बोगळे आदींसह सर्व सर्व विद्यार्थी आवर्जून उपस्थित होते,यावेळी श्री पारवे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,मला भेटलेल्या हा पुरस्कार हा माझा सन्मान नसून माझ्या सर्व विद्यार्थ्यांचा हा सन्मान आहे,उर्वरित सेवेमध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी आणखी जोमाने कामाला लागणार असल्याचे त्यांनी सांगितले, सत्कार केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.

कार्यक्रमाचे प्रास्तविक शामराव खोंडे यांनी केले  आभार प्रदर्शन केंद्रीय मुख्याध्यापक रेखाताई जोंधळे यांनी केले.....

वृत्त संकलन : 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या