💥प्रहार जनशक्ती पक्षाच्या आक्रमक आंदोलनाला यश......!


💥जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिले सोयाबीन पिक नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश💥


परभणी (दि.०८ सप्टेंबर)  - प्रहार जनशक्ती पक्ष परभणीच्या वतीने दिनांक ०४ सप्टेंबर २०२२ रोजी जिल्ह्यामध्ये पावसाने ओढ दिल्याने सोयाबीन व कापसाच्या पिकाचे नुकसान झाले असून या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावे व शेतकऱ्यांना ५० हजार रुपये हेक्टरी मदत जाहीर करणे आणि परभणी जिल्हा कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करणे साठी शासना कडे पाठपुरावा करावा या मागणी साठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुकलेले सोयाबीन व कपाशी चे धान टाकून आक्रमक आंदोलन करण्यात आले होते व जिल्हाधिकारी यांना मागणीचे निवेदन देत तात्काळ पंचनामे करण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच प्रहार जनशक्ती पक्ष पूर्णा तालुका शाखेच्या वतीने शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढून तहसीलदार यांना नुकसानीचे पंचनामे करणे बाबत निवेदन देण्यात आले होते.

प्रहार जनशक्ती पक्षाने आक्रमक आंदोलनाद्वारे केलेल्या मागणीला यश आले असून परभणी जिल्हाधिकारी यांनी दिनांक ०६ सप्टेंबर २०२२ रोजी एक बैठक घेऊन जिल्ह्यातील कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना ०९ सप्टेंबर २०२२ पर्यन्त जिल्ह्यातील विविध मंडळा अंतर्गत झालेल्या सोयाबीन पिकाच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रहार जनशक्ती पक्षाने घेतलेल्या आक्रमक भुमिकेमुळे शेतकरी बांधवांना न्याय मिळाला असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे आभार मानले आहेत.

आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हाप्रमुख गजानन चोपडे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख माधवीताई घोडके, उप जिल्हाप्रमुख रामेश्वर जाधव, उपजिल्हा प्रमुख नरेश जोगदंड, पूर्णा तालुका प्रमुख शिवहार सोनटक्के, शेतकरी आघाडी तालुकाप्रमुख सय्यद मुस्तफा, दिव्यांग आघाडी तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर पंढरकर, शहर प्रमुख धर्मेंद्र तूपसमूद्रे, महिला आघाडी शहर प्रमुख आरतीताई जुमडे, श्रीहरी इंगोले, गजानन कुऱ्हे, नितीन कदम, गंगाधर इंगोले,  सर्कल प्रमुख श्याम भोंग, मीडिया प्रभारी नकुल होगे शहर चिटणीस वैभव संघई, उद्धव गरुड, माऊली गरुड, सचिन शेरे, दतराव रवंदळे, मुंजा गरुड, श्रीधर गरुड, शेख नाझेर इतयादींनी सहभाग नोंदवीला होता......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या