💥परभणी जिल्ह्यात दौऱ्यावर आलेल्या कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना मागण्यांचे निवेदन सादर....!


💥सामाजिक कार्यकर्ते अतिशनाना गरड यांनी दिले कृषी मंत्र्यांना निवेदन💥

परभणी (दि.२४ सप्टेंबर) - महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे आज शनिवार दि.२४ सप्टेंबर २०२२ रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता सामाजिक कार्यकर्ते अतिशनाना गरड यांनी कृषी मंत्री मा.ना.अब्दुल सत्तार यांची भेट घेऊन त्यांना जिल्हातील शेतकरी बांधवाच्या हितासाठी महत्वाच्या पाच मागण्यांचे निवदेण दिले.

त्यांनी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना दिलेल्या निवेदनात एकंदर पाच मागण्या केल्या असून यात जिल्हातील सर्व मंडळाचा पीक विमा अग्रीम रक्कमे साठी समावेश करावा,मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना सुरु करण्यात यावी,पोकरा योजनेत जिल्हातील सर्व गावांचा समावेश करण्यात यावा,पोकरा योजनेत शेतकरी गट,कंपनी स्थापन झाली याचा शेतकऱ्यांना लाभ देण्यात यावा,पेडगांव येथे मेगा टेक्सटाईल पार्क उभारणी करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत...



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या