💥पुर्णा तालुक्यातील माखणीतील प्रगतशिल शेतकरी तथा पत्रकार आवरगंड यांच्याकडून दोन शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार....!


💥जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक राम महाजन व गजानन पवार यांना देण्यात आला आदर्श शिक्षक पुरस्कार💥 

पुर्णा (दि.20 सप्टेंबर) - तालुक्यातील माखणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज दि.17 सप्टेंबर रोजी "मराठवाडा मुक्ती संग्राम दिन" अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजकुमार ढगे सर यांनी केले.याप्रसंगी आदर्श शिक्षक दोन पुरस्कार देण्यात आले माखणी येथील प्रगतीशील शेतकरी जनार्धन आवरगंड यांच्या वतीने देण्यात आला 2022-23 या वर्षासाठी दोन शिक्षकांना दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार  .राम महाजन सर व.गजानन पवार सर यांना देण्यात आला.यामध्ये शाल,श्रीफळ, मेडल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.याप्रसंगी संजयकुमार जोशी,व्यवस्थापन समितीचे सदस्य .सदाशिव आवरगंड, .रजीत आवरगंड चांदाजी आवरगंड .बंडू गाडे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.त्याचबरोबर स्पर्धा परिक्षेसाठी ऊत्कृष्ट तयारी करणा-या   दोन शिक्षकांना प्रोत्साहन पर विशेष सन्मान करण्यात आला.यामध्ये  सुरज पौळ सरांना मिशन IAS साठी तर .सुनील शेळके सरांना NMMS परीक्षेत मार्गदर्शन केल्याबद्दल देण्यात आला.कु ,गायत्री आवरगंड   Nmms या ऊतीर्ण झाल्या बदल तीचा सन्मान करण्यात आला  यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी "मराठवाडा मुक्ती संग्राम दिनावर"आधारित सुंदर भाषणे सादर केली.यानंतर मान्यवरांच्या हस्ते भाषणात सहभागी विद्यार्थ्यांना, इंग्रजी शब्द स्पर्धेतील विद्यार्थ्यांना व मिशन IAS परीक्षेत यश मिळवणा-या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.या कार्यक्रमाला उपस्थित माण्यवर गोविंद आवरगंड संजय आवरगंड नेमाजी गाडे कल्याण आवरगंड सदाशिव आवरगंड आनुरथ आवरगंड चादाजी आवरगंड रजीत आवरगंड आगंद आवरगंड भगवान आवरगंड परसराम पुरी राजु गाडे गावकरी उपस्थित होतेअध्यक्षीय समारोप जनार्धन आवरगंड यांनी केले.तर आभार प्रदर्शन .सुरज पौळ सर यांनी व्यक्त केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक संजयकुमार जोशी सौ,जोती झटे  मॉडम  राजकुमार ढगे मुंजाजी आवरगंड देविदास पल्लमपल्ली रामआवरगंड आदीनी परीश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या