💥पुर्णेतील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या जागेवरील कच्ची अतिक्रमण झाली पक्की....!


💥नगर परिषद मुख्याधिकारी अजय नरळे कुंभकर्णी झोपेत ? अतिक्रमण तात्काळ जमीनध्वस्त करण्याची मागणी💥

पूर्णा (दि.०८ सप्टेंबर) - शहरातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या जागेवरील अनधिकृत कच्ची अतिक्रमण हळुवारपणे पक्की होत असतांना नगर परिषद मुख्याधिकारी अजय नरळे कुंभकर्णी झोपेत आहेत की काय ? असा प्रश्न उपस्थित होत असून शहरातील अतिक्रमण धारक व भुखंड माफियांनी शहरातील तब्बल बावीस साडेबावीस एक्कर शासकीय गायरान जमीन नगर परिषदेतील भ्रष्टाचारी अधिकारी/कर्मचाऱ्यांना हाताशी धरून बनावट रजिष्ट्र्यांसह बनावट कागदपत्रांच्या आधारे गिळकृत केल्याचे गंभीर प्रकरण उजेडात आले असतांनाच शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या जागांवरील कच्च्या अतिक्रमणांचे पक्क्या बांधकामात खुलेआम रुपांतर होत असतांना नगर परिषद प्रशासन मात्र हेतुपुरस्कर याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे नागरीकांमध्ये तिव्र संताप व्यक्त होत असून जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या जागेवर अतिक्रमण केलेले सदरील अवैध बांधकाम काढून देण्याची मागणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय नरळे यांच्या कडे एका निवेदनाद्वारे जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या वतीने करण्यात आली आहे.

पूर्णा शहरातील बस स्थानक रोडवर असलेल्या जिल्हा परिषदे माध्यमिक शाळेची भरपूर जागा आहे ही जागा मुख्य रस्त्यावर असल्याने त्या जागेवर अनेक भुखंड माफियांची या जागेवर वक्रदृष्टी आहे जागांच्या वाढलेल्या किंमती लक्षात घेत भुखंड माफीया नगर परिषद प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी/कर्मचाऱ्यांना हाताशी घेऊन या जागेवरील कच्ची अतिक्रमण पक्की करण्याला प्राधान्य देत असल्याचे निदर्शनास येत आहे या जागे संदर्भात प्रकरण न्यायालयात गेले होते न्यायालयाने शाळेच्या बाजूनी निकाल दिला आहे तरी पण या जागेवरचे अतिक्रमण निघाले नाही उलट या जागेवर बांधकाम परवानगी नगर परिषद पूर्णा तर्फ देण्यात आली त्यामुळे आता अतिक्रमण धारक पक्के बांधकाम करत असल्याचे पुन्हा एकदा शाळे तर्फ या बाबत निवेदन देऊन ही नपा प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.महावीर नगर येथील रहिवासी इलियास शे अजिज यानी अतिक्रमण केलेल्या जागे वर पक्के बांधकाम केले आहे त्यामुळे त्यास देण्यात आलेला बांधकाम परवाना तत्काळ रद्द करून सदर अतिक्रमण काढून देण्याचे निवेदन पुन्हा एकदा दि 7 सप्टेंबर रोजी मुख्याधिकारी अजय नरळे यांना शाळे तर्फ देण्यात आला आहे या निवेदना वर शाळेचे मुख्याध्यापक सय्यद सर,शालेय व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष मोहन लोखंडे,उपाध्यक्ष प्रकाशदादा कांबळे यांचे स्वाक्षऱ्या आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या