💥पुर्णा तालुक्यात चोवीस तासात दगडाने ठेचून निर्घृण हत्येच्या दोन घटना...!



💥
चुडावा पोलिस स्थानकाच्या हद्दीतील पिंपरण येथे ६९ वर्षीय वृध्द महिलेची मद्यपी मुलानेच केली दगडाने ठेचून मातेची हत्या💥

पुर्णा (दि.२१ सप्टेंबर) - तालुक्यात मागील चोवीस तासात अक्षरशः दगडाने ठेचून निर्घृण हत्येच्या दोन घटना घडल्यामुळे सर्वत्र दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून काल दि.२० सप्टेंबर २०२२ रोजी पुर्णा शहरातील रेल्वे स्थानक क्रमांक चार लगत असलेल्या तडीपार परिसरात अज्ञात नराधमाने २० वर्षीय अनोळखी तरुणीची दगडाने तोंड ठेचून केलेल्या निर्घृण हत्येला चोवीस तासही उलटत नाही तोच आज बुधवार दि.२१ सप्टेंबर २०२२ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास तालुक्यातील चुडावा पोलिस स्थानकाच्या हद्दीतील पिंपरण येथे एका अंदाजे ६९ वर्षीय वृध्द महिलेची दगडाने तोंड ठेचून हत्या झाल्याचे उघडकीस आल्यामुळे खळबळ माजली आहे.

या घटने संदर्भात आज बुधवार दि.२१ सप्टेंबर रोजी सकाळी ०९-०० वाजेच्या सुमारास गावचे पोलिस पाटील यांच्याकडून माहिती मिळताच चुडावा पोलिस स्थानकाचे सहाय्यक पोलिस निरिक्षक शिवप्रकाश मुळे यांना माहिती मिळताच ते फौजदार पंडीत,पोहेकाँ.सावंत,पोहेकाँ.रफीक शेख,पोकाँ.मिटके या आपल्या सहकारी पोलिस पथकासह पिंपरण येथील घटनास्थळावर दाखल झाले हत्या झालेल्या वयोवृध्द महिलेचे नाव सुलोचनाबाई शंकरराव सोनटक्के असल्याचे पोलिस सुत्रांकडून समजते या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळावर उपविभागीय पोलिस अधिकारी ब्रम्हानंद गावडे हे देखील दाखल झाले व त्यांनी हत्ये संदर्भात सखोल चौकशी केली या घटने संदर्भात चुडावा पोलिस स्थानकात प्रथमतः अज्ञात आरोपी विरोधात कलम ३०३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतु पोलिस प्रशासनाने घटने संदर्भात सखोल तपास केला असता असे निदर्शनास आले की मयत महिलेचा मुलगा आरोपी मारोती शंकरराव सोनटक्के राहणार पिंपरण यानेच दारूच्या नशेत दगडाने मारहाण केल्यामुळे मयत सुलोचनाबाई सोनटक्के या वृध्द मातेला आपला जिव गमवावा लागला चुडावा पोलिसांनी तात्काळ आरोपीला ताब्यात घेतले असल्याचे समजते पुर्णा तालुक्यात चोवीस तासात दोन हत्येच्या घटना घडल्यामुळे पोलिस प्रशासन देखील हादरले असून जिल्हा पोलिस अधिक्षक जयंत मिना यांनी अवघ्या तासातच पिंपरण हत्येच्या घटने प्रकरणी चुडावा पोलिस स्थानकासह पुर्णा पोलिस स्थानकाला देखील भेट दिली....   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या