💥पुर्णेतील विद्या प्रसरिणी सभेची हायस्कूल शाळेतील खेळाडू गौरी खंदारेला पश्चिम विभागीय राष्ट्रीय स्पर्धेत सिल्वर मेडल...!


💥गौरी खंदारे या खेळाडूचे प्रशिक्षक सज्जन जैस्वाल यांनी तिला यशस्वीपणे मार्गदर्शन केले💥 

पुर्णा (दि.10 सप्टेंबर) - छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे दि.09 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर २०२२ पर्यंत आयोजित पश्चिम विभागीय राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातून गौरी गंगाधर खंदारे या खेळाडूंनी ॲथलेटिक्स स्पर्धेत 3 किलोमीटर चालणे या स्पर्धेत महाराष्ट्  राज्याला सिल्वर मेडल मिळवून देत महाराष्ट्र राज्यासह परभणी जिल्हा व जिल्ह्यातील पुर्णा तालुक्याचे देखील नाव रोशन केले असून या खेळाडूचे प्रशिक्षक सज्जन जैस्वाल यांनी तिला यशस्वीपणे मार्गदर्शन केले यानिमित्त तिचे सर्व महाराष्ट्र स्तरावरून कौतुक होत आहे.

या खेळाडूचे अभिनंदन परभणी जिल्ह्याचे खासदार संजय उर्फ बंडु जाधव,आमदार राहुल पाटील,गंगाखेड चे आमदार रत्नाकर गुट्टे, जिल्हाप्रमुख विशाल कदम महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशन अध्यक्ष आदिल सुमारीवाला सचिव सतिश उचिल महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशन कोषाध्यक्ष माधव शेजुळ सुशील इनामदार   विद्या प्रसरिणी शाळा या संस्थेचे अध्यक्ष डॉ.दत्तात्रेय वाघमारे, उपाध्यक्ष भिमरावजी कदम,सचिव श्रीनिवासजी काबरा,व्हि.जी.रुद्रवार,साहेबराव कदम.काकडे साहेब शाळेचे माजी मुख्यध्यापक डॉ.हरिभाऊ पाटील, मुख्याध्यापक डॉ.देविदास उमाटे, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका अतिया मॅडम लंगडी असोसिएशन चे अध्यक्ष संतोष एकलारे संघटनेचे रंजीत काकडे शान्तीलाल मुथा अमृतराव कदम गोविंद कदम पत्रकार जगदीश जोगदंड सर सतिश टाकळकर पुर्णा तालुका ॲथलेटिक्स असोसिएशन अध्यक्ष सुधाकर खराटे डॉ.इंगोले साहेब आनंद अजमेरा मोकिंद भोळे दिनेश चौधरी प्रकाश बनाटे, कैलास टेहरे प्रकाश रौंदळे पुरुषोत्तम देवढे सतिश बरकुंटे रावसाहेब हानवते सिद्दिकी फारुक सचिन डहाळे सचिन पांचाळ व सर्व शिक्षकवृंद शिक्षकेत्तर कर्मचारी पुर्णेतील सर्व नागरिकांनी तिचे अभिनंदन केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या