💥पाथरी शहराचे माजी नगराध्यक्ष जुनेद खान दुर्रानी "आयडॉल ऑफ महाराष्ट्र'' पुरस्काराने सन्मानित.....!


💥सेवानिवृत्त विभागिय आयुक्त डॉ.दिपक म्हैसकर यांच्या हस्ते  पुरस्कार हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले💥

किरण घुंबरे पाटील

पाथरी (दि.१९ सप्टेंबर) : - सकाळ वृत्तसमूहाच्या वतीने 'आयडॉल ऑफ महाराष्ट्र' पुरस्कार वितरण सोहळा प्रतिवर्षी साजरा होत असतो. यंदाच्या पुरस्कारासाठी पाथरी शहराचे माजी नगराध्यक्ष युवानेते जुनेद खान दुर्रानी यांची निवड करून सकाळ वृतपत्राच्या वतीने करण्यात आली होती १६ सप्टेबर रोजी नांदेड येथील तुलसी हॉटेल येथील एका शानदार समारंभात दुर्रानी यांना  सेवानिवृत्त विभागिय आयुक्त डॉ दिपक म्हैसकर यांच्या हस्ते  पुरस्कार 'आयडॉल ऑफ महाराष्ट्र' हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

या वेळी मंचावर सकाळ वृतपत्र समुहाचे संपादक माने ,तिरूमला ग्रुपचे आपेट यांची उपस्थिती होती.याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना  जुनेद खान दुर्रानी म्हणाले की,माझ्या सामाजिक राजकीय जीवनात मला पाठबळ देणाऱ्या प्रत्येकाचे मनस्वी आभार मानतो त्याच बरोबर

"तमाम पाथरीकरांनी मतदानाच्या माध्यमातून दिलेल्या पदाचा वापर विधायक कामांसाठी करण्याचा निश्चय मनात धरूनच मी नगराध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. या माध्यमातून शहरातील विविध भागातील स्वच्छता, रस्ते व सांडपाणी  नियोजन संबधी लहान-लहान गोष्टींचे निरीक्षण करून त्यात येणाऱ्या अडचणींचा सूक्ष्म अभ्यास करून त्या दूर करण्यासाठी सक्षम पाऊले टाकली. 

आमच्या या सगळ्या प्रयत्नांचा जो निकाल आपल्या हाती आला, तो आपण सर्वांनी गौरवाने मिरवला. केंद्र शासनाचे स्वच्छतेचे एका पाठोपाठ एक असे पुरस्कार पाथरी नगरपरिषदेने पटकावले. हे सर्व आपणा सर्वांनी दिलेल्या प्रेम व आशीर्वादामुळे होऊ शकले. मी या पुरस्काराबद्दल 'सकाळ' वृत्तपत्र समूह व पाथरीकरांचे मनःपूर्वक आभार मानतो," अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना यानिमित्ताने व्यक्त केल्या.

या वेळी त्यांच्या सोबत माजी नगरसेवक लालू खान, अलोक चौधरी,गोविंद हारकाळ,नसिरोद्दीन सिद्दीकी,एजाज खान,पत्रकार धनंजय देशपांडे या सहका-यांची उपस्थिती होती....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या