💥औरंगाबाद येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त प्रधानमंत्री उद्योजकता महारोजगार मेळाव्याचे आयोजन...!


💥शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,रेल्वे स्टेशन रोड,औरंगाबाद येथे दि17/18 सप्टेंबर 2022 रोजी आयोजन💥 

परभणी (दि.16 सप्टेंबर) : राज्यातील सुशिक्षीत बेरोजगार युवक युवतींसाठी खाजगी क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे "कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत" मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त "प्रधानमंत्री उद्योजकता महारोजगार मेळाव्याचे दि. 17 व 18 सप्टेंबर 2022 रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रेल्वे स्टेशन रोड, औरंगाबाद येथे आयोजन करण्यात आलेले आहे. 

या महारोजगार मेळाव्याव्दारे बजाज ऑटो, नवभारत फर्टीलायझर, अजंता फार्मा, एनआरबी बेअरिंग्स, अजित सीडस, फोर्ब्स, धूत ट्रान्समिशन, इंडयुरंस टेक्नोलॉजी, व्हॅराक इंजिनिअरींग, देवगिरी फोर्जींग्स, रुचा इंजिनिअर्स, श्री सेवा कॉम्प्युटर्स, परम स्किल्स, नील मेटल, मराठवाडा ऑटो कॉम्पो, पिट्टी इंजिनिअरींग अशा विविध नामांकित कंपन्यांमधील विविध पदांच्या 5 हजार पेक्षा अधिक जागा भरण्यात येणार आहेत. महारोजगार मेळाव्यास सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांनी पुढीलप्रमाणे सहभाग नोंदवावा. 

सर्वप्रथम www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नोकरी साधक (Job Seeker) म्हणून नोंदणी करणे. वेबसाईटवरील नोकरी साधक (Job Seeker) या पर्यायावर क्लिक करणे. युजर आयडी व पासवर्ड चा वापर करुन login या पर्यायावर क्लिक करणे. प्रोफाईल मधील पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा या पर्यायावर क्लिक करणे. औरंगाबाद जिल्हा निवडून Filter या बटणावर क्लिक करावे. आपल्याला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमीत्त आयोजित रोजगार मेळावा दिसू लागेल. त्यातील Action या पर्यायावरील View Details या बटणवर क्लिक केल्यावर मेळाव्यास उपलब्ध रिक्त पदे दिसतील list of Vacancy या बटणावर क्लि करुन शैक्षणिक पात्रतेनुसार Apply करावे. आपल्याला एक संदेश दिसेल. सदर संदेश काळजी पूर्वक वाचा व Ok बटनावर क्लिक करावे, आपला रोजगार मेळाव्यामध्ये ऑनलाईन सहभाग नोंदविला आहे अशा प्रकारचा संदेश दिसू लागेल. ऑनलाईन Apply केलेल्या प्रतीसहीत मुलाखतीसाठी स्वखर्चाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रेल्वे स्टेशन रोड, औरंगाबाद येथे उपस्थित राहावे. जिल्हयातील जास्तीत जास्त सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांनी सदर प्रधानमंत्री महारोजगार मेळाव्यास सहभाग नोंदवावा असे आवाहन प्र. सो. खंदारे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, परभणी यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या