💥परभणी येथे वेदांत कंपनी स्थलांतर प्रकरणाच्या निषेधार्थ युवासेने कडून स्वाक्षरी मोहीम....!


💥युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत परभणीत निषेध स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात💥 


परभणी (दि.१५ सप्टेंबर) : महाराष्ट्र राज्याला ०१.४५ लाख कोटी रुपयांचा आणि तब्बल १ लाखांपेक्षा अधिक तरुणांना रोजगार मिळवून देणारा वेदांत कंपनीचा प्रकल्प गुजरातला पळवून लावणार्‍या खोके सरकारचा निषेध करण्यासाठी आज गुरुवार दि.१५ सप्टेंबर रोजी युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी परभणीत निषेध स्वाक्षरी मोहिमेची सुरुवात केली.


              यावेळी परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील, डॉ.विवेक नावंदर यांच्यासह  शिवसेनेच्या आजी-माजी पदाधिकार्‍यांची प्रमुख उपस्थिती होती. हिंगोली - कळमनुरी दौरा संपल्यानंतर  त्यांनी परभणीत भेट दिली. युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या उपस्थितीत परभणी येथे निषेध स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली. तसेच येथील बी. रघुनाथ सभागृहात परभणी, गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या दौर्‍या संदर्भातील नियोजन बैठक युवा सेना पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत बुधवारी संपन्न झाली.  स्वाक्षरी मोहिमेला नागरीकांनी आणि तरुणांनी सहभाग नोंदवून निषेध व्यक्त केला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या