💥जिंतूर तालुक्यातील नागरी समस्या सोडविण्यासाठी भव्य रस्ता रोको आंदोलन...!


💥या संदर्भात जिल्हा परिषद सदस्या अरुणा काळे यांनी जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन दिले💥 

जिंतूर प्रतिनिधी / बी.डी.रामपूरकर

जिंतूर हिंगोली व नांदेड जिल्ह्यास जोडणारा जिंतूर ते औंढा रस्त्यावरील खड्डयांची दुरुस्ती,भूसकवडी फाटा ते भुसकवडी ग्रामीण रस्त्याच्या कामास मंजुरी, जिंतूर तालुक्यातील महावितरण व शेतकऱ्यांचे प्रश्न व विविध विकासकामांना व बांधकामांना प्रशासकीय मंजुरी देण्याच्या मागणीसाठी त्याचबरोबर जिंतूर तालुक्यातील विविध नागरी समस्या सोडवण्याच्या मागणीसाठी, तालुक्यातील आडगाव गटातील विविध गावच्या नागरिकांच्या वतीने, माजी जिल्हा परिषद सदस्या अरुणा काळे यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी म्हणजेच दि. १७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता जिंतूर तालुक्यातील आडगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

या संदर्भात जिल्हा परिषद सदस्या अरुणा काळे यांनी जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन दिले आहे. या रास्ता रोको आंदोलनात तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्या अरुणा काळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या