💥जिंतूरच्या अर्थपुर्ती पतसंस्थेस दिपस्तंभ पुरस्कार प्रदान......!


💥महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन मुंबई यांचे मार्फत प्रदान करण्यात आला दिपस्तंभ पुरस्कार💥

जिंतूर प्रतिनिधी  /  बि.डी.रामपूरकर

महाराष्ट्र राज्य सहकारी  पतसंस्था फेडरेशन मुंबई यांचे तर्फे दरवर्षी  नागरी सहकारी पतसंस्थांना दिला जाणारा दीपस्तंभ पुरस्कार हा यंदा अर्थपूर्ती नागरी सहकारी पत संस्था मर्यादित जिंतूर या संस्थेस प्रदान करण्यात आला आहे  औरंगाबाद विभागातील रुपये एक ते दहा कोटी या गटामध्ये प्रथम पुरस्कार मिळाला आहे हा पुरस्कार पतसंस्था फेडरेशनच्या गणपतीपुळे येथे झालेल्या कार्यक्रमात राज्याचे उद्योग मंत्री श्री उदय सावंत तसेच राज्य फेडरेशनचे अध्यक्ष श्री काकासाहेब कोयटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला  संस्थेचे अध्यक्ष रत्नदीप कळमकर यांनी उपाध्यक्ष किशोर देशपांडे संचालक आनंद  रायबागकर ,मनोज बारहाते ,सिईओ अशोक चिद्रवार यांचे सह स्विकारला संस्थेचे मागील  वर्षाचे ताळेबंद नफा तोटा पत्रकांचा अभ्यास करून सर्व रेशो उत्तम असल्यामुळे तसेच संस्थेचे  संगनिकरण तसेच व्यवहारातील पारदर्शकता इत्यादी बाबींचा गुणात्मक विचार करून प्रदान करण्यात आलेला आहे.

 संस्थेकडे 31 मार्च 2022 अखेर सहा कोटी पेक्षा अधिक रकमेच्या ठेवी असून चार कोटी पन्नास लाख इतके कर्जवाटप झालेले आहे संस्थेतर्फे कर्ज सुरक्षा निधी निर्माण करून सभासदांना दिलेल्या कर्जाची सुरक्षितता निर्माण झालेली केलेली आहे त्यामुळे दुर्दैवाने कर्जदार चे निधन झाल्यास त्यास कर्ज भरण्याची गरज नाही याअभिनव कल्पनेतून करोना काळात निधन झालेल्या व्यक्तींचे कर्ज  वसूल झाले आहे  संस्थेतर्फे बचत गटानाही कर्ज वाटप केले जाते आतापर्यंत रुपये त्रेचाळीस लाख कर्ज वाटप केले असून शंभर टक्के वसुली आहे संस्थेच्या यशामध्ये संचालक मंडळाबरोबरच संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या