💥परभणी लोकसभा मतदार संघाचे खासदार संजय जाधव यांच्या गाडीचा अपघात...!💥सुदैवाने कुठलीही हाणी नाही परंतु गाडीचे झाले मोठ्या प्रमाणात नुकसान💥

परभणी (दि.२३ सप्टेंबर) - परभणी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्या वाहनाला जिल्हाधिकारी कार्यालयात अपघात आज शुक्रवार दि.२३ सप्टेंबर रोजी अपघात झाल्याची घटना घडली.

परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आज शुक्रवार दि.२३ सप्टेंबर रोजी नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीच्या बैठकिस उपस्थित राहण्यासाठी प्रवेशद्वारावर गाडी वडवली असता तलाठी राजू काजे याच्या वाहनाची त्यांच्या गाडीला जोरदार धडक बसली असून या घटनेत दोन्ही वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या घटनेत जखमी झालेले तलाठी राजू काजे हे एका खाजगी रुग्णल्यात भरती झाले असून खा संजय जाधव यांना काहीही इजा झाली नसल्याचं माहिती मिळाली आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या