💥स्टँड अप योजनेंतर्गत मार्जिन मनीसाठी भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील महिलांसाठी मेळाव्याचे आयोजन..!


💥सवलतीस पात्र नव-उद्योजक महिला लाभार्थी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन गिता गुठठे यांनी केले💥

परभणी (दि.16 सप्टेंबर) : केंद्र शासनाच्या स्टँड अप योजनेअंतर्गत भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील महिलांसाठी मार्जिन मनी उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनाने इतर मागास बहुजन कल्याण विभाग शासन निर्णय क्र सीबीसी-2019//प्र.क्र127मावक' दिनांक 6 सप्टेंबर 2019 चे शासन निर्णय निर्गमित केलेले आहे. जिल्ह्यातील भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील सवलतीस पात्र महिला नवउद्योजक लाभार्थी यांना एकुण प्रकल्प किंमतीच्या स्वहिस्सा 25% रक्कमेपैकी जास्तीत जास्त 15% मार्जीन मनी शासनाकडुन उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. 


त्याकरिता जिल्ह्यातील भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील सवलतीस पात्र महिला उद्योजक लाभार्थी यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, परभणी येथे दिनांक 21 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 12.00 वाजता केंद्र शासनाच्या स्टँड अप योजनेअंतर्गत भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील महिलांसाठी जास्तीत जास्त तळागाळातील लाभार्थ्यांना लाभ पोहोचण्याकरिता केंद्र शासनाच्या स्टँड अप योजनेअंतर्गत मार्जिन मनी उपलब्ध करुन देण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर महिलांसाठी सवलतीस पात्र नव-उद्योजक महिला लाभार्थी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्रीमती गिता गुठठे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, परभणी यांनी केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या