💥मानवतचे कर्तव्यदक्ष पो.नि.प्रकाश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस प्रशासनाची गुन्हेगारी संपवण्याकडे यशस्वी वाटचाल...!


💥पत्रकारांना चुकीची माहिती देऊन पोलिसांच्या कर्तव्यकठोर कामगिरीवर प्रश्न चिन्ह निर्माण करण्याचा असंतुष्टांकडून प्रयन्न💥

परभणी (दि.१७ सप्टेंबर) - जिल्ह्याचे अत्यंत कर्तव्यकठोर जिल्हा पोलिस अधिक्षक साहेबांच्या यशस्वी दिशा निर्देशाखाली जिल्ह्यातील पोलिस प्रशासन अत्यंत कौतुकास्पद कामगिरी बजावत असून यात जिल्ह्यातील मानवत पोलिस प्रशासन देखील आघाडीवर आहे.मानवत शहरासह तालुक्यात मानवत पोलिस स्थानकाचे पोलीस निरीक्षक प्रकाश राठोड यांच्या अत्यंत चोख मार्गदर्शनाखाली मानवत पोलिस प्रशासन शहरासह संपूर्ण तालुक्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी विशेष कामगिरी बजावत असल्यामुळे मानवत पोलिस प्रशासनाच्या कर्तव्यकठोर कामगिरीमुळे काही लोक खोडसाळपणे जाणीवपूर्वक पत्रकारांना बनावट व खोटी माहिती पुरवून दिशाभूल करीत मानवत पोलिस प्रशासनाच्या कर्तव्यतत्परतेवर प्रश्न चिन्ह निर्माण करीत असल्याचा प्रकार घडला आहे.

सोनपेठ/मानवत येथील पत्रकार तथा जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स या वेब पोर्टला वृत्तांकन करणारे वृत्त प्रतिनिधी सिध्देश्वर गिरी यांची दिशाभूल करीत मानवत पोलिस प्रशासनाच्या कर्तव्यतत्परतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रकार वृत्त प्रकाशित झाल्यानंतर लक्षात आल्यामुळे तात्काळ सदरील वृत्त वेब पोर्टलवरून हटवण्यात आले होते.कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी असो की पोलिस कर्मचारी त्यांनी केलेल्या कौतुकास्पद कामगिरीचे आपल्या वृत्तातून कौतुक करीत त्यांचे मनोबल उंचावणारी लोकहितवादी पत्रकारीता करण्याचे काम आम्ही आपल्या जंग-ए-अजितन्युज वेबवृत्त वाहिनीतून वेळोवेळी करीत आलो आहोत आणि यापुढे देखील करीत राहणार आहोत.

💥पोहेकॉ मुंजाभाऊ पायघन यांच्या बद्दलच्या प्रकाशित वृत्ता संदर्भात खुलासा💥


मानवत पोलिस प्रशासनाने पो.नि.प्रकाश राठोड यांच्या यशस्वी मार्गदर्शनाखाली मानवत शहरासह तालुक्यातून गुन्हेगारी संपुष्टात आणण्यासाठी यशस्वीपणे वाटचाल करीत आदर्श पोलीस स्थानक म्हणून ओळख निर्माण केली आहे. यात मानवत पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.बी.जाधव,पोलीस उपनिरीक्षक रमेश गिरी,गोपनीय शाखेचे हेड कॉन्स्टेबल मुंजाभाऊ कुंडलिकराव पायघन यांच्यासह सर्व पोलिस कर्मचारी व महिला पोलिस कर्मचारी हे पोलिस स्थानकाचा कारभार पारदर्शी ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावत आहेत.मात्र काही दिवसांपूर्वी काही असंतुष्ट लोकांच्या खोडसाळपणाने वरील कर्तव्यदक्ष कर्मचारी म्हणून नावलौकिक असणारे मुंजाभाऊ पायघन यांच्या विषयी हेतुपुरस्करपणे दिशाभूल करण्यात आलेल्या सिध्देश्वर गिरी यांच्याकडून पाठवण्यात आलेले वृत्त अनावधानाने जंग-ए-अजितन्यूजच्या माध्यमातून प्रकाशित झाले होते.त्या वृत्ताची शहानिशा करण्यात आली असता त्या वृत्तात कसल्याही प्रकारचे तथ्य नसल्याचे आमच्या लक्षात आल्यानंतर ते वृत्त हटवण्यात आले. कोणाची बदनामी करून हेतुपुरस्सरपणे वृत्त प्रकाशित करण्याचा आमच्या वेब पोर्टलचा हेतू नाही न्यायदायित्व टिकेल यासाठी सदरच्या पोर्टलच्या माध्यमातून वृत्त प्रसिद्ध केले जातात तरी पत्रकार सिध्देश्वर गिरी यांनी या वृत्तासंदर्भात पाठवलेल्या विनंतीपत्रा नंतर पत्रकार गिरी व जंग-ए-अजित न्युज वेब पोर्टल परिवाराकडून मानवत पोलिस स्थानकाचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक प्रकाश राठोड, गोपनीय शाखेचे पोहेकॉ  मुंजाभाऊ पायघन यांची आम्ही या द्वारे दिलगिरी व्यक्त करत आहोत...

( संपादक/संचालक - जंग -ए-अजित न्यूज वेबपोर्टल)


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या