💥पुर्णेत संविधान गौरव समिती व रेल्वे सेवानिवृत्त कर्मचारी संघटने तर्फे सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी शामराव जोगदंड यांचा सत्कार...!


💥शामराव जोगदंड हे रेल्वे खात्यात तब्बल ३९ वर्षे प्रदीर्घ सेवा करून ३१ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले💥

पूर्णा (दि.०१ सप्टेंबर) :- येथील रेल्वे कर्मचारी आयु शामराव जोगदंड हे रेल्वे खात्यात तब्बल ३९ वर्षे प्रदीर्घ सेवा करून ३१ ऑगस्ट २०२२ रोजी सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा संविधान गौरव समिती व सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी संघटनेच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या कार्यालयात जोगदंड यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.

 गौरव समिती चे प्रमुख रिपाई नेते प्रकाश कांबळे व कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अशोक कांबळे यांनी सेवानिवृत्त कर्मचारी शामराव जोगदंड यांचा सपत्नीक सत्कार केला.या प्रसंगी या उभयतांना शाल,पुष्पहार,भगवान बुद्धांची मूर्ती देवून त्यांना सन्मानित करण्यात आले गौरव समिती व कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य अमृत मोरे,विजयकुमार जोंधळे, त्रिंबक कांबळे,महानंद गायकवाड,बळीराम खारे,शिवाजी थोरात,गंगाधर कांबळे,शेख महेमुद ,हरिभाऊ हणमंते,भीमा बाहुले,प्रभाकर त्रिभुवन,भगवान गायकवाड,नगरसेवक अनिल खर्गखराटे,महेंद्र खर्ग खराटे, सामाजिक कार्यकर्ते दादाराव पंडित,सिध्दार्थ भालेराव, मोहन लोखंडे आदि मान्यवरानी जोगदंड यांचा सपत्नीक सत्कार केला.

     या प्रसंगी रेल्वे कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अशोक कांबळे यांनी शामराव जोगदंड यांच्या रेल्वेतील सेवेचा व त्यांनी मजदुर युनियन संघटनेत केलेल्या कमाचाही गौरव केला.आयु.जोगदंड यांचे धार्मिक क्षेत्रात ही उल्लेखनीय कार्य असल्याने अनेकांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले.या कार्यक्रमाचे सूत्र संचलन व आभार प्रदर्शन शाहीर गौतम कांबळे यांनी केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या