💥जिंतूर येथील विविध शाळा शासकीय कार्यालय ठिकाणी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न...!


💥मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन तालुक्यात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा💥

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

आज दिनांक 17 सप्टेंबर 2022 वार शनिवार रोजी जिंतूर शाळा विविध शासकीय कार्यालयामध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. त्याच बरोबर श्री संचारेश्वर प्राथमिक विद्यालय, जिंतूर या संस्कार केंद्रात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून श्री महालिंगअप्पा कुरे तसेच प्रमुख पाहुणे  श्री राजाभाऊ नगरकर (ज्येष्ठ पत्रकार ) श्री सचिन रायपत्रीवार (पत्रकार)  श्री वसंतराव पुराणिक मा. श्री सुरेश राव ठोंबरे श्री प्रसाद खेर्डेकर, श्री सुरेश अन्नदाते यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने करण्यात आली. 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सुरेश अन्नदाते सरांनी केले. मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनाची माहिती श्री शिवाजी समोसे यांनी विद्यार्थ्यांना सांगितली इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांनी पर्यावरणसंरक्षण, प्लॅस्टिक मुक्त नाटिकेचे सादरीकरण केले या नाटिकेतून प्लॅस्टिकच्या वापरामुळे सजीवावर कसे दुष्परिणाम होतात हे या नाटिकेतून कु. सानिका हाके, खुशी घुगे, राधिका घुगे, समृद्धी पेनुरकर, चि. कार्तिक जंबरे,अथर्व कानडे, ओमप्रकाश रेणके,साई बुलबुले, आशिष जाधव, आदित्य दुधवडे या विद्यार्थ्यांनी या नाटीकेतून छान संदेश दिला.

या नाटीकेसाठी विज्ञान शिक्षक श्री किरण नाईक यांनी मार्गदर्शन केले प्रतिक दहिफळे या विद्यार्थ्यांने वाढदिवसानिमित्य एक रोपटे भेट दिले तेच रोपटे संस्कार केंद्राच्या रौप्य महोत्सवानिमित्त मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती विजयमाला फड तसेच आभार प्रदर्शन श्रीमती रुपाली सोनसळे यांनी केले. 

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवाजी समोसे,किरण नाईक, संजय गायकवाड, बाळासाहेब ठोंबरे, दत्ता राठोड, उषा खराबे,दिपाली देशपांडे, मोनिका घोडके, राणूबाई सुगरामकर या सर्व शिक्षकांनी प्रयत्न केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या