💥पुर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथील जिल्हा परिषद शाळेत भव्य चित्रकला स्पर्धा आयोजनासह बक्षीस वितरण संपन्न....!


💥स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सवी वर्षानिमित्त कृषीयोद्धा शेतकरी उत्पादक कंपनी चा अभिनव उपक्रम💥


पुर्णा (दि.०१ सप्टेंबर) - तालुक्यातील धानोरा काळे येथील जिल्हा परिषद शाळेत चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रमात बोलताना भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ सुभाष कदम यांनी विद्यार्थी पालक शिक्षक यांना मंत्रमुग्ध करून टाकत त्यांनी राबवलेल्या "माझ गाव माझी शाळा" या अभियानातील आठवणी सांगत आपले गाव आपली शाळा कशा पद्धतीने विकसित करता येईल या विषयी सखोल असे मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांत मिसळून विद्यार्थीप्रिय शिक्षकासारखा मनमोकळा संवाद साधला यावेळी पालकासोबत व शिक्षकांसोबत देखील संवादातून मार्गदर्शन करत भौतिक सुविधा म्हणजे शाळा नसून गुणवत्ता मिळणे व गुणवान विद्यार्थी घडवणे हे ध्येय समोर ठेऊन सर्वांनी प्रयत्न केले तर निश्चित विद्यार्थ्यांत बदल होत यश गाटतील यासाठी  पालक व शिक्षकांचे हाकेला तत्पर असल्याचे  सांगितले.


          १५ ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त व डॉ. सुभाष कदम (भाजपा जिल्हाध्यक्ष, ग्रामीण) यांच्या वाढदिवसानिमित्त "हर घर तिरंगा" चित्रकला स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना बक्षिसाचे वाटप करण्यात आले यात १-४ थी एक गट,५-७ वी दुसरा गट,८-१० वी तिसऱ्या गटातील प्रथम द्वितीय तृतीय व उल्लेखनीय कार्याबद्दल भरभरून शालेय साहित्याचे व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले यात विद्यार्थ्याला स्कूल बॅग ,रजिस्टर वह्या,पेन,बॉटल, बक्षीस म्हणून देण्यात आल्या.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शा.व्य. स.उपाध्यक्ष दिलीप काळे तर प्रमुख मार्गदर्शक डॉ.सुभाष कदम होते कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कृषीयोद्धा शेतकरी उत्पादक कंपनी सचिव गजानन आंबोरे,अध्यक्ष प्रताप काळे, शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष प्रमोद अंबोरे, आदर्श माता  कमलाबाई काळे,भुजंगराव काळे भगवानराव काळे,शिवराम काळे, संजीवनी शिक्षण संस्थेचे हिंगे उपस्थित होते.

अध्यक्षीय समारोपात प्रमोद आंबोरे यांनी आपल्या भाषणात गोळेगाव शाळेतील उपक्रमाची माहिती देत कशा पद्धतीने शाळेचा विकास केला याचे मार्गदर्शन केले.यशस्वीतेसाठी मुखुध्यापक डुकरे, शिक्षक त्र्यंबक स्वामी,सचिन खोसे,साळवे,दुमणे,सौ.पोळ, बांगरे यांनी सहकार्य केले यावेळी बालाजी काळे,अशोक काळे,एकनाथ काळे,सुधाकर काळे,आदीसह विद्यार्थी,पालक,शिक्षक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या