💥जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी आकारल्या जाणाऱ्या अतिरिक्त शुल्का संदर्भात डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाचे निवेदन...!


💥नगर परिषद प्रशासनाकडून सामान्य नागरिकांना जन्म-मृत्युची नोंद करतांना १०० रुपये शुल्क आकारण्यात येत आहे💥

 पुर्णा (दि.०२ सप्टेंबर) डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया या युवक संघटनेकडून पुर्णा नगर परिषद प्रशासडून जन्म-मृत्यु प्रमाणपत्रासाठी घेण्यात येणाऱ्या अतिरिक्त शुल्काच्या विरोधात निवेदन मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले. सामान्य नागरिकांना जन्म-मृत्यु ची नोंद करत असताना शंभर रुपये शुल्क आकारण्यात येत आहे आणि या शुल्काची पावतीसुद्धा नागरिकांना देण्यात येत नाही, पावती मागितल्यास 'अरे-रावी' ची भाषा वापरण्यात येते , याचा सामान्य नागरिकांना खूप त्रास होत आहे, त्यामुळे जन्म-मृत्यु प्रमाणपत्रासाठी लागणारे शुल्क कमी करून नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांनी सहकार्याच्या भूमिकेत असावं तसेच आकारण्यात येणाऱ्या शुल्काची पावतीसुद्धा देण्यात यावी ही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या मागणीची पूर्तता न झाल्यास नगर परिषदेसमोर तीव्र निदर्शने करण्यात येतील असा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे. या निवेदनावर जिल्हाउपाध्यक्ष व तालुका सचिव अमन जोंधळे, पांडुरंग दुथडे, हर्षवर्धन अहिरे , धीरज अहिरे , राज जोंधळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या