💥शिवसेनेचे माजी आमदार हरीभाऊ लहाने यांच्या शिवसेना (शिंदे) गटात प्रवेशाने शिंदे गटाला बळकटी येणार...!


💥परभणी जिल्ह्यात शिवसेनेला उतरतीकळा : शिवसेना शिंदे गटाला बळकटी💥


१९८६ साली हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांचा झंझावात शिवसेनेच्या रुपाने मराठवाडयात आल्यानंतर या हिंदुत्वाच्या झंझावातात स्वतः झोकून देवून पाथरी विधानसभा मतदारसंघात प्रस्थापित काँग्रेस नेत्यांच्या विरोधात गावोगावी पाथरी, सेलू, मानवत तालुक्यात शिवेसनेच्या शाखा स्थापन करून हिंदुत्वाचा विचार रुजवला, ज्या काळात प्रस्थापित कांग्रेस नेत्यांच्या विरोधात पोलिसांच्या विरोधात जाण्याची कुणाची हिंमत नव्हती त्या काळात महाविद्यालयीन शिक्षण संपवलेल्या एका तरुणाने परभणी जिल्ह्यात शिवसेनेचा विचार रुजवण्याचे कार्य केले त्या खमक्या नेतृत्वाचे नाव आहे हरीभाऊ लहाने. १९८६ ते १९९० या चार वर्षात शिवसेनेची संघटना बांधणी केल्यानंतर १९९० च्या विधान सभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे तत्कालीन मंत्री अँड.गणेशराव दुधगावकर यांच्या विरोधात शिवसेनेकडून उमेदवारी घेवून २५ हजारावर मताधिक्याने हरीभाऊ लहाने काका प्रथम आमदार झाले. अन्यायाविरुद्ध लढण्याचा बाणा, बाळासाहेबांचे हिंदुत्ववादी विचार घेवून मतदार संघातील जनतेचे विकासाचे प्रश्न सोडवण्याचा त्यांनी ध्यास घेतला. विरोधी पक्षात असल्यामुळे संघर्ष करून निधी मिळवावा लागत होता. परंतु १९९५ च्या निवडणुकीमध्ये जनतेने त्यांना परत मोठ्या मताधिक्याने निवडून दिले राज्यात शिवसेना भाजपाचे सरकार आले. शिवसेनेचे श्री मनोहर पंत जोशी मुख्यमंत्री तर मा. गोपीनाथरावजी मुंडे साहेब उपमुख्यमंत्री झाले. १९९५ ते १९९९ या पाच वर्षात पाथरी सेलू मतदार संघाचा आ. हरिभाऊ काका लहाने यांनी कायापालट करून टाकला. गोदावरी नदी काठावरील जिल्ह्यातील गावांना दळणवळणासाठी रस्त्याची सुविधा नव्हती. त्यामुळे नाबार्ड रस्ते विकास योजने अंतर्गत गोदावरी नदी काठावरील सर्व गावे, शहराला डाबरी रस्त्यांनी जोडले, पाथरी मानवत सेलू तालुक्यात वीज पुरवठा सतत खंडीत होत होता. पाथरी येथे १३२ केव्ही सबस्टेशन व अनेक गावांत ३३ केव्ही सबस्टेशन उभारून विजेचा प्रश्न मिटवला. गोदावरी नदीवर विटा येथे पुल उभारून सोनपेठ व पाथरी तालुका रस्त्याने जोडला. पाथरी येथील न्यायालय इमारत उभारली. परभणी जिल्ह्यातील सेलू व जिंतूर तालुक्यातील २८ हजार हेक्टर शेत जमीन जलसिंचनाखाली आणण्यासाठी अनेक वर्ष रखडलेला सेलू तालुक्यातील लोअर दुधना धरण प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे हट्ट करून तत्कालीन प्रधानमंत्री मा. अटल बिहारी वाजपेयी यांचेकडे प्रस्ताव पाठवून केंद्रीय जल आयोगाकडून लोअर दुधना धरणाला ५०० कोटींचा निधी

मंजूर करून प्रकल्पाचे काम पूर्ण केले. आज हे धरण दरवर्षी पूर्ण क्षमतेने भरले जाते. सेलू व जिंतूर तालुक्यातील उजाड जमिनीवर शेतकरी नंदनवन फुलवत आहेत. याच काळात सत्तेचा फायदा घेत परभणी जिल्ह्यातील सेलू, मानवत व सोनपेठ तालुक्यांची निर्मिती करून या ठिकाणी सर्व कार्यालये जनतेच्या सेवेसाठी निर्माण केली. मतदार संघात सेलु, पाथरी या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय, वाचाळा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र इतर ठिकाणी आरोग्य विषयक सुविधा, शैक्षणिक सुविधा जनतेला उपलब्ध करून दिल्या. पाथरी तालुक्यात पाथरी येथे उच्च शिक्षणासाठी नितीन कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाची उभारणी केली. विविध क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी व चांगले खेळाडू निर्माण करण्यासाठी राज्य पातळीवरील क्रीडा स्पर्धा आयोजित केले. मागील २५ वर्षापासून सेलू येथे हिंदुहृदयसम्राट शिवेसना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय निमंत्रीत क्रिकेट स्पर्धा आयोजित केली जाते. हे करत असल्याने सर्व सामान्य जनतेवरील शासकीय वा सामाजिक अन्यायाच्या विरोधात कधीही रस्त्यावर उतरणारा नेता म्हणून मा. आ. हरीभाऊ लहाने यांचा दबदबा होता आणि सर्वसामान्य जनता, गुराखी, गोरगरीब, शेतकरी, तरुण यांच्या सोबत राहून त्यांच्या सोबत रस्त्यात शेतात, झोपडीत भारकी खाणारा शिवसैनिक म्हणून ते जनतेत लोकप्रिय आहेत. त्यांच्या याच गुणांमुळे १९९९ साली ते परत तिसऱ्यांदा आमदार झाले. कार्यकत्यांना लाल दिव्याच्या गाडीत बसवणारा नेता हरीभाऊ लहाने काका यांच्या डोक्यात कधीच सत्तेचं भुत शिरलं नाही. पंधरा वर्षे आमदार असतानाही त्यांनी ज्या शिवसैनिकांनी आपल्याला आमदार केले त्यांचा विसर पडू दिला नाही. हरीभाऊ काकांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याना जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या कृषी उत्पन्न बाजार समिती, नगर परिषदांमध्ये सदस्य ते अध्यक्षापर्यंतची पदे मिळवून दिली.

परभणी जिल्ह्याच्या इतिहासात आत्तापर्यंत दोन वेळेस शिवसेनेच्या सर्वसामान्य शिवसैनिकांना दोन वेळेस जिल्हा परिषद अध्यक्ष करून लाल दिव्याच्या गाडीत बसण्याचा सन्मान दिला. अनुक्रमे सेलू तालुक्यातील सौ. वनमाला विनायकराव खंडागळे व पाथरीच्या सौ. गवळणबाई दतु नागमोडे यांना दोन वेळा जिल्हा परिषद अध्यक्ष करून जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकवला. सं पाथरी, मानवत पंचायत समिती, सेलू पंचायत समिती, नगर परिषद, सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती, सेलू, पाथरी या संस्था त्यांच्या काळात शिवसेनेच्या ताब्यात होत्या. त्यांच्या नंतर स्थानिक स्वराज्य संस्था वा इतर सत्तेची ठिकाणे कधीच आतापर्यंत शिवसेनेने ताब्यात ठेवून शिवेसनेला बहुमान देणारा नेता जिल्ह्यात उदयाला आला नाही हे त्या नंतरचं दुर्दैव आहे. त्या काळात जिल्ह्यात शिवसेनेचे चार पैकी तीन आमदार सेनेचे खासदार सेनेचे, स्थानिक 'स्वराज्य संस्था सेनेच्या ताब्यात असायच्या. कारण त्या काळात सर्व नेते कार्यकर्ते शिवेसेनेच होते. गटबाजी नव्हती. सर्व एक दिलाने निवडणुकीत काम करायचे. परंतु, त्या काळात आलेल्या नवीन नेतृत्वाने ज्यांनी त्यांना नेते केले त्या जुन्या त्यागी नेत्यांना गटबाजी करून संपवण्याचे उद्योग केले. बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या विचारांना मानणारा शिवसैनिकाला बाजुला करायचे, जो मला मानेल तोच शिवसैनिक असा प्रकार सुरू झाला. माझ्या मनावर उमेदवारी मिळाली तरच निवडून येणार नाही तर तो शिवसैनिक कसा पराभूत होईल हेच प्रयत्न झाले. गटबाजीमुळे आज अनेक शिवसेना पदाधिकारी व

शिवसैनिक अस्वस्थ आहेत. नवीन नेतृत्व तयारच होवू दिले जात नाही. चांगल्या कार्यकत्यांची कुंचबना पक्षात जिल्ह्यामध्ये होत आहे. त्यातच जे शिवसैनिक बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार घेवून शिवसेनेला वाढवण्यासाठी २५ ते ३० वर्षे राबराब राबले काँग्रेस, राष्ट्रवादी नेत्यांसोबत रस्त्यावर दोन हात करत आले. अनेक गुन्हे अंगावर घेतले, त्या शिवसैनिकांना मागील तीन वर्षात आपल्या विचाराशी प्रतारणा करून स्थानिक व राज्यपातळीवरील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यापुढे हुजरेगिरी करण्याचे दिवस आले. त्यामुळे शिवसैनिकांच्या स्वाभिमानाला बाळासाहेबांच्या हिदुत्वाच्या विचारांना कुठे तरी ठेच पोहचल्याची भावना, उदवेग, निराशा, शिवसैनिकांत निर्माण झालेली आहे. मनाची अशी घुसमट होत असताना शिवसेनेचे स्थानिक खासदार, आमदार शिवसैनिकांना कवडीची किंमत देत नाहीत. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यातील शिवसैनिक, हिंदुत्ववादी मतदार यांचा स्वाभिमान शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे तेजस्वी विचार जीवंत ठेवणारा, शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीपासून वाचवणारा एक ध्रुवतारा मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या रुपाने मिळाला आहे. त्यामुळे राज्यातील करोडो जनता व लाखो शिवसैनिक आज मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांकडे हिंदुत्वाचा तेजस्वी सूर्य म्हणून पाहत आहेत. त्याच भावनेने आज परभणी जिल्ह्यातील पाथरी विधान सभेचे १५ वर्षे आमदार राहिलेले शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख व शिवसेनेचे जिल्ह्यातील जनतेचे दबंग नेते म्हणून किर्ती असलेले माजी आ. हरीभाऊ काका लहाने मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करीत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांना ताकद द्या, परभणीत बदल घडेल - गोविंदराव गायकवाड (तालुकाप्रमुख)

परभणी जिल्हा हा नेहमीच हिंदुत्ववादी विचारांच्या पाठीशी राहिला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आज सक्षमपणे पुढे नेत आहेत. मनाने खचलेल्या शिवसैनिकांत शिंदे साहेबांमुळे नवचैतन्य येत आहे. परभणी जिल्ह्यातही आज माजी आ. हरीभाऊ लहाने, माजी खा. सुरेशदादा जाधव, भास्करराव लंगोटे, के. के. कदम, प्रवीण देशमुख, जिल्हाप्रमुख व्यंकटराव शिंदे, जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सौ. वनमाला खंडागळे, सौ. गवळणबाई नागमोडे, अशोकराव गिराम, विठ्ठलराव राम गोविंदराव गायकवाड, पंडीतराव आरकुले, संतोष गात विनायकराव रोडगे, विनायकराव खंडागळे, प्रकाश ताठे, काशिनाथ घुंबरे असे अनेक आजी, माजी जि.प. सदस्य, नगरसेवक, पं.स. सदस्य व शिवसेनेचे पदाधिकारी प्रवेश करीत आहेत. जिल्ह्यातील संपर्क प्रमुख माजी खा. सुरेशदादा जाधव, माजी आ. हरीभाऊ काका लहाने यांचे मागे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेबांनी आपली ताकद लावल्यास भविष्यात परभणी जिल्ह्यामध्ये हिंदुत्ववादी विचारांची ताकद दुप्पटीने वाढेल व येणाऱ्या काळात परभणी जिल्ह्यातील लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर परिषदमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांचे शिलेदार निश्चितच विजयी होतील, असा विश्वास वाटतो.


जय हिंद, जय महाराष्ट्र

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या