💥न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती नरसिंहा यांच्या घटनापीठापुढं आता २७ सप्टेंबरला सुनावणी होणार💥
✍️ मोहन चौकेकर
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात २७ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचं प्रकरण घटनापीठापुढं सुरु आहे. यापूर्वीच्या सुनावणीत २७ सप्टेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली होती. मंगळवारी दुसऱ्या क्रमांकावर सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या घटनापीठापुढं सुनावणी करण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टातील सुनावणीमध्ये निवडणूक आयोगाची कारवाई, १६ आमदारांचं निलंबन, विधानसभा उपाध्यक्षांचे अधिकार यापैकी एका मुद्यावर अग्रक्रमानं सुनावणी सुरु होऊ शकते.सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या घटनापीठापुढं होत आहे. पाच सदस्यीय घटनापीठात न्यायमूर्ती एम. आर.शाह, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती नरसिंहा यांच्या घटनापीठापुढं आता २७ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.
सुप्रीम कोर्टात ७ सप्टेंबरला महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी झाली होती. घटनापीठापुढं १० मिनिटांची सुनावणी झाली होती. त्या सुनावणीत घटनापीठानं निवडणूक आयोगाला शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत कोणताही निर्णय घेऊ नये, असे आदेश दिले होते. शिवसेनेकडून कपिल सिब्बल यांनी घटनापीठापुढं युक्तिवाद केला होता. तर, शिंदे गटाकडून गेल्या सुनावणीत शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवण्याची मागणी केली होती. त्यावर अभिषेक मनू सिंघवी यांनी आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात अगोदर निर्णय घेण्याची मागणी केली होती.
* घटनापीठात कोणत्या मुद्यावर सुनावणी होणार ?
सुप्रीम कोर्टात विविध याचिकांवर सुनावणी सुरु आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटानं १६ आमदारांच्या निलंबनाच्या नोटीस विरोधात याचिका दाखल केली होती. शिवसेनेनं १६ आमदारांना निलंबित करावं, अशी याचिका केली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या व्हिपला दिलेल्या मान्यतेला विरोध करणारी याचिका,विधानसभेचं अधिवेशन अवैध होते, असा दावा करणारी शिवसेनेची याचिका यावर सुप्रीम कोर्टात घटनापीठापुढं सुनावणी सुरु आहे. शिंदे गटानं निवडणूक आयोगाच्या कामकाजाला परवानगी द्यावी आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवावं अशी मागणी केली आहे. तर, दुसरीकडे शिवसेनेनं पहिल्यांदा आमदारांच्या निलंबनावर सुनावणी व्हावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळं २७ सप्टेंबरला नेमक्या कोणत्या मुद्यावर प्रथम सुनावणी होणार हे पाहावं लागणार आहे.....
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या