💥परभणी शहरातील अहिल्याबाई होळकर नगर येथे प्रहार जनशक्ती पक्षाची शाखा स्थापन....!


💥गाव तिथे शाखा व घर तिथे प्रहार सैनिक तयार करण्यासाठी जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले💥 

परभणी (दि.१० सप्टेंबर) - जनसामान्याच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून न्याय मिळवून देण्याच्या आपल्या अनोख्या शैलीमुळे संपूर्ण जिल्ह्यातील सामान्य जनतेच्या मनात घर केलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाची ताकत संपूर्ण जिल्ह्यात वाढत आहे. पक्षाच्या वतीने आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका विचारात घेता संघटन वाढीवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून गाव तिथे शाखा व घर तिथे प्रहार सैनिक तयार करण्यासाठी जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले आहेत.

काही दिवसापूर्वी मागील २० वर्षांपासून रस्ते दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या शहरातील अहिल्याबाई होळकर नगरातील नागरिकांना प्रहार जनशक्ती पक्षा मुळे न्याय मिळाला होता व प्रहार च्या रेट्यामुळे तेथील रस्त्याची दुरुस्ती महानगर पालिकेने केली होती.

प्रहार जनशक्ती पक्षामुळे आपल्याला न्याय मिळाला असून भविष्यात पण प्रहार जनशक्ती पक्ष च आपल्याला न्याय देऊ शकतो या विश्वासावर काल दि. ०९ सप्टेंबर २०२२ रोजी संध्याकाळी परभणी शहर एम.आय. डी. सी. परिसरातील अहिल्याबाई होळकर नगर येथे प्रहार जनशक्ती पक्षाची शाखा स्थापन स्थापन करण्यात आली व शाखेच्या नामफलकाचे अनावरण पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांच्या हस्ते व युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे आणी महिला आघाडी जिल्हा प्रमुख माधवीताई घोडके यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले या वेळी शहर प्रमुख धर्मेंद्र तुपसमुद्रे, महिला आघाडी शहर प्रमुख आरतीताई जुमडे,  शहर चिटणीस वैभव संघई, मीडिया प्रभारी नकुल होगे यांच्या सह सत्यजित खांडके, दिपक कुचे, हरिभाऊ गुहाडे, देवराव दिपके, प्रकाश  सदावर्ते, अशोक जाधव, वाघमारे मामा यांच्या सह परिसरातील महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.

*शाखा कार्यकारणी खालील प्रमाणे -*

शाखा प्रमुख - जयश्रीताई पारवे

उपशाखा प्रमुख - छायाताई खांडके

सचिव - मिनाताई जाधव

सह सचिव - गोदावरीताई दिपके

कोषाध्यक्ष - मंदाताई सावंत

शाखा सदस्य - गयाबाई कुटे, शामलाताई सदावर्ते, निर्मलाताई ढेंबरे, कांचनताई लांडगे, वर्षाताई वाघमारे, संगीताताई वाघमारे, शिलाताई दिपके......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या