💥नांदेड येथील आयुर्वेद महाविद्यालयाचे नाव बदलून गुरू गोबिंद सिंघजी शासकीय आयुर्वेद महाविद्याल रुग्णालय असे द्या...!


💥आम आदमी पार्टी चे सदस्य तथा मुख्य संपादक दैनिक अर्थ चे ॲड.अनुप आगाशे यांनी केली मागणी💥

नांदेड :- "शासकीय आयुर्वेद महाविद्याल रुग्णालय व रसशाळा नांदेड" हे नाव बदलून "गुरू गोबिंद सिंघ शासकीय आयुर्वेद महाविद्याल  रुग्णालय व रसशाळा नांदेड" असे नाव करावे अशी मागणी आम आदमी पार्टी चे सदस्य तथा मुख्य संपादक दैनिक अर्थ चे ॲड. अनुप आगाशे यांनी दिनांक १६/९/२२ रोजी मा. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मा. देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मा. विभागीय आयुक्त औरंगाबाद, मा.जिल्हाधिकारी साहेब नांदेड, मा. पोलीस अधीक्षक साहेब नांदेड यांना ई-मेल मार्फत निवेदन  देऊन मागणी करण्यात आली, मागणी जर पूर्ण नाही झालीतर जिल्हाधिकारी कार्यालय समोर १४/११/२२ रोजी साखळी उपोषण करण्यात येईल निवेदनात असे म्हटले आहे.


    गुरू गोबिंद सिंग यांच्या मुळे आज नांदेड पवित्र झाले आहे अश्या महान गुरू चे आज नांदेड शहरात गुरुद्वारा आहे याचे नांदेड जिल्ह्यातील लोकांना अभिमान आहे . आज नांदेड शहरात भारतातून अनेक राज्यातून गुरुचे दर्शनासाठी नांदेडला येतात तर अनेक विदेशातून सुद्धा गुरू भक्त गुरू गोबिंद सिंग यांच्या गुरुद्वारा येथे माथा व दर्शन घेण्यासाठी नांदेड नगरीत येतात ही नांदेड वासियासाठी अभिमानाची गोष्ट आहे अश्या महान गुरुचे नाव हे "शासकीय आयुर्वेद महाविद्याल रुग्णालय व रसशाळा नांदेड" हे बदलून "गुरू गोबिंद सिंघ शासकीय आयुर्वेद महाविद्याल  रुग्णालय व रसशाळा नांदेड" असे करण्यात यावे

     11 नोव्हेंबर 1675 रोजी गुरू गोबिंद सिंग हे गुरु झाले, जेव्हा ते केवळ 9 वर्षांचे होते. वयाच्या 9 व्या वर्षी जगातील सर्वात शक्तिशाली समुदायांपैकी एकाची कमान घेणारे गुरु गोविंद सिंग हे केवळ नायक नव्हते तर ते एक भाषा तज्ञ आणि चांगले लेखक देखील होते. त्यांना संस्कृत, फारसी, पंजाबी आणि अरबी भाषांचे ज्ञान होते. त्यांनी अनेक ग्रंथ रचले, जे आजही शीख समाजात उत्साहाने वाचले जातात. 

   शिखांचे गुरु गोविंद सिंग यांनी 1699 साली खालसा पंथाची स्थापना केली. शीखांच्या इतिहासातील ही सर्वात महत्त्वाची घटना मानली जाते. गुरु गोविंद सिंग यांनीच गुरु ग्रंथ साहिब यांना शिखांचे गुरू घोषित करून गुरु परंपरा संपुष्टात आणली. 

      धर्माच्या रक्षणासाठी गुरु गोविंद सिंग यांनी एक एक करून आपल्या संपूर्ण कुटुंबाचं बलिदान दिलं होतं. यानंतर त्यांना 'सर्बंसदानी' (सर्वज्ञ दाता) असेही संबोधले जाऊ लागले. याशिवाय लोक त्यांना कलगीधर, दशमेश, बजनवाले अशा अनेक नावांनी हाक मारत.

    निवेदनात केलेली मागणी पूर्ण होईल अशी अपेक्ष्या करतो . 

    अश्या महान गुरुचे नाव गुरू गोबिंद सिंग शासकीय आयुर्वेद महाविद्याल  रुग्णालय व रसशाळा नांदेड असे नाव देण्यात यावे अशी मागणी आम आदमी पार्टी चे सदस्य तथा मुख्य संपादक दैनिक अर्थ चे ॲड. अनुप आगाशे यांनी केली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या