💥पुर्णा तालुक्यातील गणपूर शिवारात धावत्या प्रवासी रेल्वेची धडक लागल्यामुळे २१ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू....!💥परभणीहून नांदेडकडे जाणाऱ्या बेंगलूर एक्सप्रेसच्या धडकेत ममदापूर येथील तरून शेतकरी गोविंद काळबांडे यांच्या मृत्यू💥

पुर्णा (दि.०१ सप्टेंबर) - तालुक्यातील मौ.गणपूर शिवारातील लोहमार्गावर काल बुधवार दि.३१ आगष्ट २०२२ रोजी रात्री ०९-३० वाजेच्या सुमारास परभणीहून नांदेडकडे धावणाऱ्या बेंगलोर एक्सप्रेसची धडक लागल्यामुळे मौ.ममदापूर येथील तरुण शेतकरी गोविंद पंडीतराव काळबांडे वय २१ वर्षे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.

या घटने संदर्भात सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील मौ.गणपूर येथील तरुण शेतकरी तथा मोटारसायकल मेकानिक गोंविंद काळबांडे हे नेहमी प्रमाणे पुर्णा येथील मोटारसायकल गेरेजवर काम करून रात्री ०९-३० वाजेच्या सुमारास मौ.ममदापूर येथे जात असतांना गणपूर शिवारातील लोहमार्गावर त्यांना परभणीहून नांदेडकडे जाणाऱ्या धावत्या बेंगलोर एक्सप्रेसची धडक लागल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला या घटने संदर्भात  ममदापूरचे पोलिस पाटील विनंता काळबांडे यांनी तात्काळ पुर्णा पोलिस स्थानकात माहिती दिल्याने पुर्णा पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी रवाना झाले यावेळी घटनास्थळ पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी शासकीय ग्रामीण रुग्नालयात रवाना केला या घटने संदर्भात पुर्णा पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे...... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या