💥पूर्णेतील रेल्वे परिसरातील मुख्य रस्त्याच्या कामाला अखेर सुरूवात....!


💥रस्त्याच्या झालेल्या दुर्दैवी अवस्थेकडे पत्रकारांनी वेधले होते रेल्वे प्रशासनाचे लक्ष💥

पूर्णा (दि.०४ सप्टेंबर) - येथील रेल्वे स्थानकासह परिसरातील विविध रेल्वे कार्यालयांसह लोहमार्गा पलिकडील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर,सिध्दार्थ नगर,महात्मा फुले नगर,नालंदा नगर,हरिनगर आदींसह विविध परिसरांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची अत्यंत दुर्दैवी अवस्था झाली होती त्यामुळे या परिसरातील नागरिकांना या रस्त्याने वावरतांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.

या रस्त्याच्या झालेल्या दुर्दैवी अवस्थेकडे प्रथमतः येथील महाबोधी न्यूज चॅयनच्या माध्यमातून पत्रकार प्रदिप नन्नवरे यांनी रेल्वे प्रशासनातील उच्च अधिकारी  यांना जुलाई महिन्यात संपर्क साधून सदरील रस्त्याच्या झालेल्या भयंकर दुर्दैवी अवस्थे संदर्भात सतर्क केले होते या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना, शाळकरी मुलांना,वाहनधारकांना होत असलेल्या नाहक त्रासातून मुक्त करावे अशी विनंती देखील केली होती व सदरील रस्त्यामुळे वाहने पलटण्याची शक्यता दर्शवीली होती व रस्त्यामुळे वाहनांचा अपघात होऊन काही  अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी रेल्वे प्रशासनातील संबंधित अधिकारी यांच्यावर राहील असा ठोस इशारा दिला होता परंतु रेल्वे प्रशासनातील अधिकारी यांनी रस्त्याचे कामास लवकरच सुरूवात करण्यात येईल असे आश्वासन दिले होते दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करीत रेल्वे प्रशासनाने रस्त्याच्या कामाला सुरुवात करून दिलेला शब्द पाळला त्याबद्दल प्रदिप नन्नवरे व पूर्णतील नागरिक यांनी रेल्वे प्रशासनाचे अभिनंदन केले.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या