💥पुर्णा तालुक्यात सरसकट कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी....!


💥राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार रांना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रताप कदम यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले निवेदन💥

पुर्णा (दि.२४ सप्टेंबर) - महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री नामदार.आ.अब्दुल सत्तार हे आज शनिवार दि.२४ सप्टेंबर रोजी पुर्णा शहरात आले असता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रताप कदम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेऊन पुर्णा तालुक्याल सरसकट कोरडा दुष्काळ जाहीर करून. प्रती हेक्टरी ५०,००० हजार रुपये अनुदान देण्यात यावे बाबत चर्चा केली या मागणीचे निवेदन देखील त्यांना देण्यात आले यावेळी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाला या न्यायिक मागणी मंजूरी संदर्भात सकारात्मक होकार देखील दिला.

 
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष बाबा पठाण,मा.नगरसेवक मो.हाजी खूरेशी,मा.नगरसेवक शे शरीफ शेख नबी,मा नगरसेवक शेख खुदुस शेख बशीर साहब,मा.नगरसेवक अमजद नुरी,मा.नगरसेवक मधुकर गायकवाड,मा.नगरसेवक विरेश कसबे,मा.नगरसेवक बालु भाऊ कदम, युवा नेते प्रकाश जमदाडे, जेष्ठ नेते दयानंद कदम, संतोष सातपुते,संतोष पटाईत,युवा नेते रऊफ बागवान,इश्यू पठाण,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवा शहर अध्यक्ष अन्वर पठाण,सोहेल पठाण,शे.ईमरान,जावेद पठाण,मुजीब पठाण,शे.अजीम,इम्रान अयनुर.शेख, विष्णू परिसरात कदम,शुभम वाटोडे, गणेश इंगोले,कुष्णा दामोधराव कदम, विकास कुऱ्हे आदी मान्यवर उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या