💥पुर्णा शहरासह तालुक्यात गणपती विसर्जन मिरवणूक शांततेत व उत्साहपुर्ण वातावणात संपन्न....!


💥शहरातील २५ तर ग्रामीण भागातील ६५ गणेश मंडळांनी केले उत्साहपुर्ण वातावरणात गणपती विसर्जन💥

💥गणपती विसर्जन मिरवणूकीतील देखावे सजावट पाहण्यासाठी महिला अबालवृध्द तसेच सर्वधर्मिय समाज बांधवांनी केली गर्दी💥


💥प्रथमच पोलिस प्रशासनाने बजावला चोख बंदोबस्त : पोलिस प्रशासनाचे सर्वसामान्य जनतेतून होत आहे कौतुक💥 

पुर्णा (दि.१० सप्टेंबर) - शहरासह संपूर्ण तालुक्यात गणपती विसर्जन उत्साहपुर्ण धार्मिक वातावरणासह शांततेत पार पडले शहरातील एकून २५ गणेश मंडळांनी वाजत गाजत अत्यंत धार्मिक वातावरणात ढोल ताशे हलकी टाळ मृदंगाच्या निनादात गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर याअश्या गगनभेदी जयघोशात आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे विसर्जन केले या गणपती विसर्जन मिरवणूकीत अनेक गणेश मंडळांनी धार्मिक/सामाजिक/देशभक्तीपर देखावे सादर केले यावेळी शहरातील सर्वधर्मिय समाज बांधव तसेच महिला अबालवृध्दांनी देखील श्री गणपती विसर्जन मिरवणूकीतील सुंदर देखावे सजावट पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती पोलिस प्रशासनाने जागोजाग चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे महिलांनी देखील मोठ्या प्रमाणात श्री गणपती विसर्जन मिरवणूकीत सहभाग नोंदवला हे विशेष.


पुर्णा शहरातील २५ गणेश मंडळांसह पुर्णा पोलिस स्थानकाच्या हद्दीतील ग्रामीण भागातल्या ६५ अश्या एकून ९० गणपती मंडळांनी ठराविक वेळे अगोदरच आपआपल्या गणपती मुर्तींचे अत्यंत उत्साहपुर्ण वातावरणात शांततेत विसर्जन केले गणपती महोत्सवाच्या काळात तसेच गणपती विसर्जन मिरवणूकीत देखुल पुर्णा पोलिस स्थानकाचे कर्तव्यदक्ष अधिकारी पो.नि.सुभाषचंद्र मारकड यांच्यासह सहकारी अधिकारी/कर्मचारी तसेच महिला पोलिस अधिकारी/कर्मचाऱ्यांनी प्रत्येक गणेश मंडळाला वेळोवेळी प्रत्यक्ष भेटी देऊन तसेच कर्मचारी/होमगार्ड बंदोबस्त देऊन श्री गणेश महोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी अत्यंत कर्तव्यदक्षपणे भुमिका निभावल्यामुळे प्रथमच श्री गणेश महोत्सव शांततेत पार पडल्यामुळे पोलिस प्रशासनाचे सर्वसामान्य जनतेतून कौतुक होत आहे.


तालुक्यातील चुडावा पोलिस स्थानकाच्या हद्दीतील स्थानिक ०५ तसेच ग्रामीण भागातील ६८ अश्या एकून ७३ गणेश मंडळांनी देखील अत्यंत उत्साहपुर्ण धार्मिक वातावरणात शांततेत गणपती विसर्जन केले तर ताडकळस पोलिस स्थानकाच्या हद्दीतील स्थानिक १२ व ग्रामीण भागातील ६८ अश्या एकून ८० गणेश मंडळांनी अत्यंत उत्साहपुर्ण वातावरणात शांततेत गणपती विसर्जन पार पाडले दरम्यान कान्हेगाव येथील दोन आणि नांदगाव येथील दोन गणपती विसर्जन दुसऱ्या दिवशी म्हणजेच दि.१० सप्टेंबर रोजी होणार असल्याचे समजते पुर्णा/चुडावा/ताडकळस पोलिस प्रशासना प्रमाणेच विद्युत महावितरण तसेच नगर परिषद ग्रामीण भागांतील स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनांनी देखील यावेळी आपआपली जवाबदारी यशस्वीपणे पार पाडीत गणेश महोत्सव काळासह श्री गणेश विसर्जन मिरवणूकीत चोख भुमिका बजावल्यामुळे श्री गणेश महोत्सवात कुठल्याही प्रकारचा व्यत्यय न येता हा धार्मिक उत्सव शांततेत व सुरळीतपणे पार पडला....

💥श्री गणेश महोत्सवासह विसर्जन मिरवणूकीत पोलिस प्रशासन/न.पा. प्रशासन/विद्युत महावितरण विभागाने निभावली महत्वपुर्ण भुमिका :-


पुर्णा शहरात श्री गणपती विसर्जन मिरवणूक दरम्यान महिला अबालवृध्दांना श्री विसर्जन मिरवणूकीत गणपती मंडळांनी केले उत्कृष्ट देखावे पहातांना तसेच गणरांयाचे दर्शन घेतांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये याकरीता शहरातील प्रत्येक चौकांसह सार्वजनिक रस्त्यांवर विशेष खबरदारी म्हणून नगर परिषद प्रशासन/पोलिस प्रशासन तसेच विद्युत महावितरण विभागाकडून विद्युत रोशनाईसह तात्पुरते बेरीकेट देखील उभारण्यात आले होते यावेळी संबंधित विभागातील अधिकारी कर्मचारी स्वतः परिस्थितीवर विशेष लक्ष ठेवून होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या