💥परभणीचे शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांच्यावर गुन्हा दाखल करा - शिक्षण उपसंचालक अनील साबळे


💥असे आदेश माध्यमिक शिक्षणाधिकारी आशा गरूड यांना विभागीय शिक्षण उपसंचालक अनील साबळे यांनी दिले💥

परभणी /गंगाखेड (दि.२३ सप्टेंबर) - नियमबाह्य विनाअनुदानित सह शिक्षकास अनुदानित पदावर वैयक्तिक मान्यता देणाऱ्या तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांनी सुनावनी दरम्यान घाम पुसत माझी स्वाक्षरी नव्हेच असा पाविञा घेतल्याने बनावट दस्तावेज तयार स्वाक्षरी करून शासनाची फसवणूक करणाऱ्यावर विठ्ठल भुसारे यांनी वेळेत गुन्हा दाखल न केल्यास विठ्ठल भुसारे वरच गुन्हा दाखल करण्याचे आदेश माध्यमिक शिक्षणाधिकारी आशा गरूड यांना विभागीय शिक्षण उपसंचालक अनील साबळे यांनी दिले.पण त्यांनी गुन्हाच दाखल केलेला नसल्याने शिक्षण उपसंचालक कोणाची पाठराखण करीत आहेत असाच प्रश्न निर्माण झाला आहे.


परभणी जिल्हातील खाजगी शिक्षण संस्थेत नियमबाह्य शिक्षक भरती प्रकरणात शिक्षक संघटनेच्या नेत्याने स्थानिक आमदार यांना हाताशी धरून परभणी माध्यमिक शिक्षणाधिकारी आशा गरूड यांच्या संगनमताने जिल्हातील खाजगी शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विभागात दोन सह शिक्षक तर दोन शिक्षकेत्तर कर्मचारी भरती केलेली आसताना केवळ एकाच सह शिक्षक भरती बाबत विभागीय शिक्षण उपसंचालक यांना अहावाल पाठवून वैयक्तिक मान्यता सेवासातत्य रद्द करण्याची अजब शिफारस करण्यात आली.माध्यमिक शिक्षण अधिकारी आशा गरूड यांनी मागील काळात प्राथमिक विभागात शिक्षण अधिकारी पदावर आसताना जिल्हातील खाजगी शिक्षण संस्थेत बॕकडेट मध्ये केलेल्या नियमबाह्य शिक्षक भरतीचा विसर पडलेला दिसत आहे तर गरूड मॕडम यांनी जालना येथे केलेला गैरप्रकार प्रकरणी उचल बांगडी केल्याचे लक्षात नसावे असेच दिसत आहे.जिल्हात 500 च्यावर शिक्षक भरती आसताना केवळ आमदाराचा दबावा मुळे केलेला प्रकार त्यांचा अंगलट येण्याचे स्पष्ट दिसत आहे.दि.6 सप्टेंबर रोजी विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या दालनात झालेल्या सुनावनी दरम्यान संस्थेचा मुख्यध्यापक स्वंयघोषीत सचीव माध्यमिक शिक्षणाधिकारी आशा गरूड उपस्थित होत्या तर सह शिक्षक यांना सुनावनी बाबत लेखी तोंडी न कळविल्याने गैरहजर होता या सुनावनी दरम्यान स्वंयघोषीत सचीवानी सदरील शिक्षण संस्थेत सन 2011पासून ते आजतागायत संस्थेने माध्यमिक शाळेत कोणतीही भरती केलेली नसून भरती बाबत संस्थेने कोणताही ठराव घेतलेला नाही असे लेखी निवेदन सादर केले आसता माध्यमिक शिक्षणाधिकारी आशा गरूड मुग गिळून गप्प का बसल्या असाच प्रश्न निर्माण होत आहे.याच संस्थेच्या माध्यमिक विभागात सन 2018-2021 दरम्यान दोन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सेवा सातत्य आशा गरूड यांनी दिलेले आसल्याने हाताची घडी तोंडावर बोट ठेवून गप्प राहण्याची भुमिका पार पाडलेली दिसत आहे या सुनावनी दरम्यान विभागीय शिक्षण उप संचालक यांनी एक नव्हे तर दोन सह शिक्षक भरती संदर्भात तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांचा जवाब घेतला आसता अनुदानीत तत्वावर प्रदान केलेल्या आदेशावर माझी स्वाक्षरी नसल्याचे एका दमात सांगुन टाकत घाम पुसला.अखेर सावळ्या विठ्ठलास खोटे बोलावे लागले यांचा प्रत्यय दिसुन आला  विभागीय शिक्षण उपसंचालक अनील साबळे यांनी दिलेल्या निर्णयात सह शिक्षकांचा वैयक्तिक मान्यता सेवा सातत्य रद्द करून तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांचा सह्या स्वाक्षरीचे बनावट दस्तावेज तयार करून शासकीय कार्यालयात उपयोग करणे अत्यंत गंभीर बाब आसून या प्रकरणी शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांनी बनावट दस्तावेज करणाऱ्यावर 15 सप्टेंबर पर्यत गुन्हा दाखल करावा व अहवाल सादर करावा विहित मुदतीत विठ्ठल भुसारे यांनी बनावट आदेश प्रकरणी गुन्हा दाखल न केल्यास विद्यामान शिक्षण अधिकारी आशा गरूड यांनी विठ्ठल भुसारे यांचेवर गुन्हा दाखल करावा व अनुपालन अहवाल सादर करावा असे आदेशित केले होते.पण अद्याप पर्यत कसलाही गुन्हा दाखल न झाल्याने विभागीय शिक्षण उपसंचालक अनील साबळेच परभणीत येऊन आशा गरूड विठ्ठल भुसारेवर गुन्हा दाखल करणार आसल्याचे स्पष्ट होत आहे...

धन्यवाद साभार : वृत्तसंकलन श्री भिसे गंगाखेड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या